लखेश्वर यादव (जंजगीर चंपा), 08 एप्रिल : छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात नववीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मलखरोडा ब्लॉकमधील किरारी गावातील ही घटना आहे. विद्यार्थ्याने परीक्षेत नापास झाल्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणपत रात्रे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो मालखरोडा येथील किरारी गावात राहत होता. घटनेच्या दिवशी विद्यार्थी घरात एकटाच होता. त्यांचे नातेवाईक नोकरीसाठी परराज्यात गेले होते. परीक्षेत नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याने गावाबाहेरील महुआच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच मालखरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून तपास करत आहेत.
आत्महत्या करण्यापूर्वी गणपतने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने हे जग सोडल्याचे सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी म्हणत आहे की, मला आता या जगात राहायचे नाही. मुलाच्या आत्महत्येमुळे त्याचे आई-वडील आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
धक्कादायक! मद्यधुंद प्रवाशाचा पुन्हा विमानात धिंगाणा, घडलं असं काही की सर्वांनी रोखला श्वास