नवी दिल्ली : विमान प्रवासादरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशांकडून वेळोवेळी विचित्र प्रकार होत असल्यााचं समोर आलं आहे. पुन्हा एकदा विमानप्रवासात मद्यधुंद तरुणानं धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांकडून असभ्य वर्तनाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. इंडिगो विमाना एक प्रवाशानं मद्यधुंद अवस्थेत जे केलं त्यानंतर सर्वांनीच श्वास रोखून धरला होता.
A 40-year-old passenger onboard Delhi-Bengaluru IndiGo flight tried to open the emergency door flap of the aircraft in an inebriated state. Incident took place at around 7.56 am yesterday. Passenger was handed over to CISF in Bengaluru. pic.twitter.com/ZhX8HLGIaQ
— ANI (@ANI) April 7, 2023
दिल्लीहून बंगळुरूला जाणााऱ्या विमानात ही घटना समोर आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी नशेच्या अवस्थेत एका 40 वर्षीय प्रवाशाने विमानाच्या आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. बेंगळुरूला पोहोचताना प्रवाशाला CISF च्या ताब्यात देण्यात आलं.
इंडिगोच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाचा गोंधळ; प्रवासात किळसवाणे कृत्याने खळबळA passenger travelling on flight 6E 308 from Delhi to Bangalore tried opening the flap of the emergency exit in an inebriated state. On noticing this violation, the crew on board alerted the captain and the passenger was appropriately cautioned: IndiGo airlines
— ANI (@ANI) April 7, 2023
इंडिगो एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की विमान 6E 308 दिल्लीहून बंगळुरूला जात होतं. त्यातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला.
एक चूक अन् 20 प्रवाशांना सोडून एअर इंडियाच्या फ्लाईटचं उड्डाण, लोक संतापले, नेमकं काय झालं?प्रवाशाचं वर्तन पाहून क्रू मेंबर आणि वैमानिक सर्तक झाले. त्यांनी प्रवाशाला वॉर्निंग दिली. त्यानंतर विमान बंगळुरूला सुरक्षित लॅण्ड करण्यात आल्यानंतर त्याला सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आलं. गेल्या काही महिन्यांपासून विमानात असभ्य वर्तनाच्या घटना वारंवार समोर येत आहेत.