जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Shocking News: जेवण करत नसल्याने ओरडली आई; रागात 9 वर्षाच्या मुलाने स्वतःला संपवलं

Shocking News: जेवण करत नसल्याने ओरडली आई; रागात 9 वर्षाच्या मुलाने स्वतःला संपवलं

9 वर्षाच्या मुलाने स्वतःला संपवलं 
(प्रतिकात्मक फोटो)

9 वर्षाच्या मुलाने स्वतःला संपवलं (प्रतिकात्मक फोटो)

घटनेत तिसरीत शिकणार्‍या एका मुलाला आई ओरडल्याचा एवढा राग आला की त्याने आपलं जीवनच संपवलं.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 22 जुलै : 9 वर्षीय मुलाच्या आत्महत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आली आहे, जी आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडणारी आहे. घटनेत तिसरीत शिकणार्‍या एका मुलाला आई ओरडल्याचा एवढा राग आला की त्याने आपलं जीवनच संपवलं. ही घटना मुलांचा सांभाळ नेमका कसा करावा आणि पालकत्व कसं करावं, याबाबत प्रश्न निर्माण करणारी आहे. घटनेत कानपूरमध्ये एका 9 वर्षाच्या मुलाने शाळेच्या ड्रेसला असलेल्या टायने गळफास लावून घेतला. जेवायला न येता सायकल चालवत बसल्याने मुलाची आई आणि भाऊ रागाने त्याच्यावर ओरडले होते. याच कारणामुळे 9 वर्षाच्या मुलाला इतका राग आला की त्याने थेट टोकाचं पाऊल उचललं. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या नरवल भागात राहणारा सुशील कुमार यांचा 9 वर्षांचा मुलगा तिसरीच्या वर्गात शिकत होता. दुपारी तो शाळेतून परतल्यावर त्याच्या आईने त्याला जेवण दिलं. यादरम्यान त्याचा भाऊ जेवू लागला, परंतु या मुलाने जेवण घेतलं नाही. त्याला सायकल चालवण्याची आवड होती म्हणून तो सायकल घेऊन बाहेर पडला. Crime News: छ. संभाजीनगर हादरलं! सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, गरोदर राहिल्याने प्रकरण उघड मुलगा जेवत नसल्याने त्याच्या आईने त्याला खडसावलं. आईच्या ओरड्यामुळे रागावलेला हा मुलगा घरात आला. यानंतर त्याचा मोठा भाऊही त्याच्यावर ओरडला.. आई आणि भाऊ आपल्यावर रागवले हा आपला अपमान असल्याचा समज या मुलाने करून घेतला. त्याने जेवणंही केलं नाही. यानंतर रात्री त्याने घरातील टॉयलेटमध्ये जाऊन शाळेच्या ड्रेसचा टाय काढला आणि गळफास घेतला. घरातल्यांनी त्याला फासावर लटकलेलं पाहताच एकच आक्रोश केला. यानंतर मुलाला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कानपूरमधील ही घटना सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडणारी आहे. लोक अनेकदा मुलांना त्यांच्या चुकांसाठी ओरडतात, रागवतात, समजावतात, त्यांच्यावर प्रेम करतात. पण लहान वयातच त्यांच्यात एवढा राग कुठून येतो? आत्महत्येचा विचार डोक्यात कसा येतो? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. याप्रकरणी एडीसीपी अशोक कुमार सिंह सांगतात की, मुलाने शाळेच्या टायने गळफास लावून घेतला. त्याची आई सायकल चालविण्यावरुन त्याच्यावर ओरडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदन केलं. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात