मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /8 वी पास 'डॉक्टर' ने केलं गर्भवती महिलेचं ऑपरेशन; बाळासहित आईचा मृत्यू

8 वी पास 'डॉक्टर' ने केलं गर्भवती महिलेचं ऑपरेशन; बाळासहित आईचा मृत्यू

Fake Doctor Scam: एका आठवी पास डॉक्टरने (8th pass doctor) गर्भवती महिलेचं ऑपरेशन केल्याचं (operation on pregnant woman) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामुळे संबंधित महिलेचा बाळासहीत मृत्यू (Pregnant woman death with baby) झाला आहे.

पुढे वाचा ...

सुलतानपूर, 20 मार्च: एका आठवी पास डॉक्टरने (8th pass doctor) गर्भवती महिलेचं ऑपरेशन केल्याचं (operation on pregnant woman) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामुळे संबंधित महिलेचा बाळासहीत मृत्यू (Pregnant woman death with baby) झाला आहे. पीडित कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर संबंधित रुग्णालयाचं काळंबेर समोर आलं आहे. यानंतर पोलिसांनी रुग्णालयाची चौकशी केली असता, रुग्णालयातील डॉक्टर आठवी, तर संचालक 12 वी पास असल्याचं निष्पन्न झालं आहे. या अर्धवट शिकलेल्या लोकांनी वैद्यकीय क्षेत्राला व्यवसाय समजून नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला होता. पण तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित रुग्णालयाचा पर्दाफाश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील आहे. सुलतानपूरजवळील मल्लानच्या पुरवा गावची पूनम नावाची महिला गर्भवती होती. मंगळवारी रात्री कुटुंबियांनी तिला अरवल येथील मां शारदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. येथील डॉक्टरांनी पूनमवर ​​ऑपरेशन केलं होतं. पण यावेळी तिला रक्तस्त्राव झाल्यामुळे या दोघांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी दोघांनाही उपचारांसाठी लखनऊला पाठवलं. पण उपचारासाठी जात असताना वाटेतच दोघांचाही मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी तपासात केला धक्कादायक खुलासा

आई आणि बाळाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयाचे संचालक, डॉक्टर आणि इतर सहकाऱ्यांविरोधात बाल्दीराय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी जेव्हा चौकशी केली गेली, तेव्हा पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

(वाचा -अपघाताचा बनाव करून खून केला, मात्र फक्त 1 तासातच फुटलं आरोपीचं बिंग)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मां शारदा हॉस्पिटलचे संचालक, राजेश सहनी 12 वी पास आहेत. एवढंच नाही तर, रूग्णालयात तैनात असलेला कथित डॉक्टर राजेंद्र प्रसाद शुक्ला केवळ 8 वी पास आहे. तर त्याचा सहकारी केवळ 5 वी पर्यंत शिकला आहे. संचालक राजेश साहनी हे खीरी जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर डॉ. राजेंद्र आणि त्याचा साथीदार शेजारील अयोध्या जिल्ह्यातील आहे. ही अर्धवट शिकलेली लोकं रुग्णालय टाकून लोकांच्या जीवाशी खेळत होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे. .

First published:
top videos

    Tags: Baby died, Crime news, Pregnancy, Uttar pradesh, Woman doctor