जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / सोशल मीडियावरील मैत्री खूपच महागात; इंस्टाग्रामवरील मित्राकडून सुशिक्षित तरुणीची 8 लाखात फसवणूक

सोशल मीडियावरील मैत्री खूपच महागात; इंस्टाग्रामवरील मित्राकडून सुशिक्षित तरुणीची 8 लाखात फसवणूक

सोशल मीडियावरील मैत्री खूपच महागात; इंस्टाग्रामवरील मित्राकडून सुशिक्षित तरुणीची 8 लाखात फसवणूक

22 वर्षीय तरुणी ही एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 सप्टेंबर : सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर त्यातून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर मैत्री झाल्यावर लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार केल्याच्याही घटना घडल्या आहेत. यातच आता मुंबईती एका सुशिक्षित तरुणीला एक धक्कादायक अनुभव आला आहे. सोशल मीडियावरील मैत्री या तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. एका तरुणाने तिला तब्बल 8 लाख रुपयांमध्ये गंडवले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - लंडनच्या डॉक्टरसोबत इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर त्याने पाठवलेल्या गिफ्टसाठी तरुणीची 8 लाखांत फसवणूक झाली आहे. ही धक्कादायक घटना दहिसरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. दहिसर येथील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय रेश्मा (नावात बदललेले) ही एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे. या तरुणीला 5 ऑगस्टला इन्टाग्रामवर एका तरुणाच्या नावाने रिक्वेस्ट आली. यानंतर तिने ती रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्यांनी एकमेकांचे व्हॉट्सअप क्रमांक शेअर केले. या संवादादरम्यान, तरुणाने तो लंडन येथे इमरजन्सी सर्जन डॉक्टर असल्याचे सांगितले. त्या दोघांची मैत्रीही झाली. तसेच या तरुणाने तिच्यासाठी गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. तसेच या तरुणीचा विश्वास संपादन करण्यासाठी तिला व्हॉट्सअॅपवर रिसिप्टही पाठवली. त्यानंतर याच तरुणीला मागच्या महिन्यात 15 ऑगस्टला दिल्ली विमानतळावरून कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने कॉल केला. तसेच गिफ्टसाठी विविध कारणे पुढे करत पैसे उकळण्यास सुरुवात केली. या तरुणीकडून तब्बल सव्वा आठ लाख रुपये उकळण्यात आले. इतकेच नव्हे तर यानंतरही पैशांची मागणी सुरुच होती. हेही वाचा -  एक मॅसेज अन् पुनावालांच्या सिरम इन्स्टिट्युटला 1 कोटींचा गंडा! भामट्यांनी असा साधला डाव या सर्व प्रकारानंतर या तरुणीला संशय आला. मात्र, मोठी रक्कम गमावल्याने याबाबत तिने कुणालाही काहीच सांगितले नाही. अखेर, तिची फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यानंतर तिने भावाकडे याबाबत सांगितले. यानंतर भावाच्या मदतीने तिने रविवारी पोलिसांत धाव घेतली तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती देत तक्रार दिली. या तक्रारीवरुन याप्रकरणी दहिसर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात