नवी दिल्ली, 01 एप्रिल : सर्वसाधारणपणे असे मानले जाते की स्त्रिया सहनशील असतात, त्या शांतपणे सर्वकाही सहन करतात. भारतीय संदर्भ पाहता हे बऱ्याच अंशी खरं आहे. आपल्या समाजात सुरुवातीपासूनच स्त्रियांना ‘कमी’ बोलण्याची सूचना दिली जाते. लहानपणापासून ते मोठे होण्यापर्यंत आणि समज आल्यानंतरही आणि वृद्धापकाळापर्यंतही त्यांना आयुष्यभर या सूचना आणि निर्बंधांच्या पायरीवर जगावं लागतं. त्यामुळेच स्त्रीने सहनशील राहावं, असं बोललं जातं. मात्र, महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत मौन पाळले तर ते जीवघेणे ठरू शकते. त्यांची सहनशीलता देशासाठी आणि संपूर्ण समाजासाठी (Women Silence on oppression) धोक्याची घंटा आहे. NFHS-5 म्हणजेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (National Family Health Survey 5) अहवालानुसार, देशातील 11 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात केलेल्या सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की, सुमारे 70 टक्के स्त्रिया स्वतःवर झालेल्या अत्याचारांबद्दल कधीच बोलत नाहीत, आवाज उठवत नाहीत. यावर कधीही कोणाचीही मदत घेत नाहीत. या अहवालानुसार, देशातील आसाम-बिहार, मणिपूर, सिक्कीम आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांची सर्वाधिक टक्केवारी आहे. या राज्यांमध्ये अशा महिलांची संख्या 80 टक्क्यांहून अधिक आहे. त्याच वेळी, त्रिपुरा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येक अत्याचाराला मूकपणे सहन करणाऱ्या महिलांची संख्या 70 टक्क्यांहून अधिक आहे. आवाज उठवणाऱ्या महिला दडपशाहीविरुद्ध आवाज उठवण्याबद्दल किंवा मदत मागण्याबद्दल किती स्त्रिया विचार करतात? याविषयी बोलायचे झाल्यास ही आकडेवारी खूपच निराशाजनक आहे. NFHS-5 नुसार, देशात 10 टक्क्यांहून कमी महिला आहेत ज्या स्वतःवर झालेल्या अत्याचारांसाठी इतरांची मदत घेतात किंवा आवाज उठवतात. आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि जम्मू आणि काश्मीर ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे 10 टक्क्यांहून कमी महिला त्यांच्यावरील अत्याचारांसाठी बोलतात. हे वाचा - सकाळी नैसर्गिक आवाज कानावर पडणं मानसिक आरोग्य-शांततेसाठी असं ठरतं फायदेशीर मदतीसाठी काय या सर्वेक्षणादरम्यान हिंसा आणि अत्याचाराने पीडित महिलांनी सांगितले की, त्या मदतीसाठी प्रथम त्यांचे कुटुंबीय, शेजारी, पोलीस, वकील आणि धार्मिक नेत्यांची मदत घेतात. हे वाचा - डायपर वापरताना अनेकजण या चुका करतात, त्याचा बाळाला त्रास सहन करावा लागतो येथे सर्वात जास्त दुखापत सर्वेक्षणानुसार, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना डोळ्यांना मार लागणे, हाडे मोडणे, भाजणे, कापणे आणि दात तुटणे यांसारख्या घटनांचा सर्वाधिक त्रास होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.