मुंबई, 15 मार्च : राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मादी कुत्र्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका 68 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे. डीएन नगरच्या पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली आहे. ही घटना 2020 सालच्या डिसेंबरमध्ये घडली होती. ज्याचा नुकताच खुलासा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 68 वर्षीय अहमद शाह नावाच्या वयोवृद्धाने अनेक पाळीव तसंच भटक्या कुत्र्यांवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी बॉम्बे अॅनिमल राईट्स या संस्थेच्या विजय मोहन मोहनानी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे.
अहमद शाहने आतापर्यंत अनेक मुक्या प्राण्यांवर बलात्कार केला आहे, असा आरोप विजय मोहन यांनी केला होता. विजय मोहन यांच्या तक्रारीनंतर आणि एका व्हिडीओच्या आधारे डीएन शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून संबंधित वृद्धाला अटक केली आहे. हे प्रकरण चर्चेत येताच सोशल मीडिया याचे तीव्र पडसाद उमटत आहे. अनेकांनी आरोपी वृद्धाच्या कृत्याचा निषेध केला आहे.
सोशल मीडियावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अहमद शाह हा एक भाजी विक्रेता असून तो जुहू गल्लीत राहतो. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. एका स्थानिक व्यक्तीने विजय मोहनानी यांना अहमद शहाच्या या घृणास्पद कृत्याची माहिती दिली होती. आरोपी शाह हा परिसरातील भटक्या कुत्र्यांसोबत हे असं कृत्य करत असल्याचं संबंधित व्यक्तीनं सांगितलं होतं. त्यानंतर बॉम्बे अॅनिमल राईट्सच्या विजय मोहनानी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
(वाचा-सोळा वर्षाच्या मुलावर जडलं विवाहितेला प्रेम, पती अन् 3 मुलांना सोडून फरार)
आरोपीला अनेकदा समज देण्यात आली होती
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी आरोपीला अशा प्रकारचं कृत्य न करण्याचा अनेकदा इशारा दिला होता. पण आरोपीने प्रत्येक वेळी लोकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला अशा प्रकारची दुष्कर्म करण्याची सवय लागली होती. त्याला स्थानिक लोकांनी अनेकदा समज दिली होती. पण त्याने आपलं कृत्य थांबवलं नाही. त्यानंतर मोहनानी यांनी दिलेली तक्रार आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे डीएन शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी वृद्धाला अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.