Home /News /nagpur /

नागपूर हादरलं! सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा हकनाक बळी, जन्मदात्या आईनेच दिला भयंकर मृत्यू

नागपूर हादरलं! सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा हकनाक बळी, जन्मदात्या आईनेच दिला भयंकर मृत्यू

Murder in Nagpur: नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे सासू-सुनेच्या वादात एका चिमुकल्याचा हकनाक बळी गेला आहे. सासुसोबत वाद झाल्यानंतर सुनेनं आपल्या पोटच्या चिमुकल्याची भयावह पद्धतीने हत्या (mother killed son) केली आहे.

    नागपूर, 16 जानेवारी: नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील रामटेकजवळील बनपुरी येथे सासू-सुनेच्या वादात (Dispute with mother in law) एका चिमुकल्याचा हकनाक बळी गेला आहे. सासुसोबत वाद झाल्यानंतर सुनेनं आपल्या पोटच्या एक वर्षीय मुलाची भयावह पद्धतीने हत्या (Mother killed son) केली आहे. त्यानंतर तिनेही विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to commits suicide) केला आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घडला उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत रामकृष्ण घावडे असं हत्या झालेल्या एक वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. तर प्रणाली घावडे असं मुलाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे वडील रामकृष्ण घावडे हे शेती व्यवसाय करतात. त्याचं तीन वर्षांपूर्वी प्रणाली यांच्याशी विवाह झाला होता. घटनेच्या दिवशी शुक्रवारी प्रणाली यांचा घरगुती कारणावरून आपल्या सासुसोबत वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर प्रणाली यांनी आपल्या सासुला आत्महत्या करण्याची धमकी दिली. हेही वाचा-दागिन्यांपुढे माणुसकी हरली; रत्नागिरीत 3 वृद्धांचा खून करून केलं आगीच्या हवाली सायंकाळी वेदांत घरात खेळत असताना, प्रणाली यांनी त्याला जवळ घेतलं आणि विष पाजलं. यानंतर त्यांनी स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने मायलेकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी गेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करत वेदांतला मृत घोषित केलं. हेही वाचा-साताऱ्यात अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य, ब्लॅकमेल करत सुरू होता धक्कादायक प्रकार तर प्रणाली यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृत बाळाची आई प्रणाली घावडे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप प्रणाली यांना अटक केली नसून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Nagpur

    पुढील बातम्या