ठाणे, 28 मे : कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार (Job) गेले. तर अनेकांचे व्यवसायही बुडाले. त्यामुळे बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण वाढल्याचे आपल्याला दिसत आहे. अशात आता नोकरीच्या आमिषाने पैसे देऊन फसवणूक (Job Fraud) झाल्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यात आता सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तरुणींना दिले बनावट नियुक्तीपत्र -
ठाणे महानगर पालिकेत (TMC) नोकरी लावून देतो, असे आमिष देऊन सहा तरुणींकडून प्रत्येकी 10 ते 15 हजार रुपये घेण्यात आले. यानुसार त्यांना 60 हजारांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या तरुणींना बनावट नियुक्तीपत्रही (Fake Joining Letter) देण्यात आले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर उपायुक्त मारुती खोडके यांनी एका अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोनल झोगरे, सोनाली ढगे, सोनिया सावते, प्रकाश जाधव, प्रज्ज्वल पवार आणि काजल वाघमारे असे फसवणूक झालेल्या तरुणींचे नाव आहे.
अशी आली घटना समोर -
2 मार्चला वागळे इस्टेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर (Wagle Estate PHC) काजल वाघमारे ही महिला अधिपरिचारिका या पदावर हजर झाली होती. यावेळी तिने आपले नियुक्तीपत्र सादर केले. यानंतर उपआरोग्य अधिकारी डॉ. अमोल भोईर यांनी ही माहिती उपायुक्त मारुती खोडके यांना सांगितली. तेव्हा खोडके यांनी हे नियुक्तीपत्र पडताळले तर ते बनावट असल्याचे आढळले.
हेही वाचा - कॉपी करताना पकडल्याने एक वर्षासाठी निलंबित; विद्यार्थ्याने घेतला 'हा' टोकाचा निर्णय
तसेच सोनल झोगरे, सोनाली ढगे, सोनिया सावते, प्रकाश जाधव, प्रज्ज्वल पवार आणि काजल वाघमारे अशा सहा जणांच्या नियुक्तीचे आदेश दिल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर एकच खळबळ उडाली. हा प्रकार समोर आल्यानंतर उपायुक्त मारुती खोडके यांनी एका अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job, Money fraud, Thane, Thane municipal corporation