घृणास्पद! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या; चाकू आणि कुऱ्हाडीने चिरला गळा

घृणास्पद! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या; चाकू आणि कुऱ्हाडीने चिरला गळा

Hindu Family Murder in Pakistan: पाकिस्तानातील एकाच हिंदू परिवारातील पाच जणांची निघृण हत्या (5 Murders In same Family) केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदाय (Crime Against Minority) दहशतीखाली जगत आहेत.

  • Share this:

इस्लामाबाद, 06 मार्च: काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानात काही हिंसक जमावाने आणि स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी हिंदू मंदिरावर हल्ला (Attack on Hindu Temple) केला होता. या हल्ल्यात हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी पाकिस्तानच्या न्यायालयाने संबंधित आरोपींना फटकार लगावून तोडलेलं मंदिर पुन्हा उभारण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण ताजं असताना, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या मनात दहशत निर्माण करणारं दुसरं प्रकरण समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील रहीम यार खान शहरापासून अवघ्या 15 किमी अंतरावर असणाऱ्या अबुधाबी कॉलनीत राहणाऱ्या एका हिंदू कुटुंबाची काही अज्ञातांनी हत्या (Hindu Family murder in Pakistan) केली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. येथील रामचंद मेघवाल (Ramchand Meghwal) नामक व्यक्तीच्या कुटुंबातील सर्वांची गळा चिरून निर्घृण हत्या (brutally murdered) करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदू आणि शिख अल्पसंख्यांकामध्ये (Hindu and Shikh Minority in Pakistan) दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. अमर उजालाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पाकिस्तानी वर्तमानपत्र 'द न्युज इंटरनॅशनल' ने दिलेल्या वृत्तानुसार, अबुधाबी कॉलनीत राहणाऱ्या एका हिंदू परिवारातील सर्व सदस्यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि कुऱ्हाड जप्त केली आहे. हल्लेखोरांनी याच हत्यारांनी संबंधित परिवाराचं हत्याकांड केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  35 वर्षीय मृत रामचंद्र मेघवाल शांततापूर्ण मार्गाने अबुधाबी कॉलनीत राहत होते. परिसरातच त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. पण आजचा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला आहे. ही हत्या कोणी केली? किंवा या हत्येंमागचं नेमकं कारण काय आहे? याची अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

हे ही वाचा - पाकिस्तानमध्ये महिला पत्रकाराची घरात घुसून हत्या, 5 गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू

पाकिस्तानात हिंदूंना लक्ष्य केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कधी त्यांची दुकानं लुटली जातात, तर कधी त्यांना मारहाणही केली जाते. काही वेळा त्यांची मंदिर तोडली जातात. तसेच जबरदस्तीने धर्मांतर आणि गैरवर्तन केल्याच्या घटनाही कानावर पडत असतात. कट्टरपंथीयांना लगाम घालणं पाकिस्तानातील इम्रान खान सरकारला अधिकच अवघड जात आहे.

Published by: News18 Desk
First published: March 6, 2021, 7:18 PM IST

ताज्या बातम्या