हिसार, 16 फेब्रुवारी: घर भाड्याने देण्याच्या (House on rent) बहाण्याने एका घटस्फोटीत महिलेवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने एका 26 वर्षीय घटस्फोटीत महिलेवर (Divorced Women) बलात्कार केला आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची (Threat to death) धमकीही दिली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नराधम व्यक्तीला अटक करण्यात आली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना हरियाणातील हिसार येथील आहे. येथील एका घटस्फोटीत महिले राहण्यासाठी घराच्या शोधात होती. तिला एकेठिकाणी घरंही मिळालं. याच घराचा भाडेकरार करण्यासाठी संबंधित पीडित महिला न्यायालयात गेली होती. त्यावेळी तिथे तिची शमशेर सिंह नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली. या व्यक्तीने तिचा भाडेकरार करण्याचं आश्वासन दिलं आणि त्याचा मोबाईल नंबरही दिला. त्यानंतर त्याने 11 फेब्रुवारी रोजी पीडित महिलेला न्यायालयीन परिसरात बोलावलं आणि भाडे तत्त्वावर राहणार असाल, तर माझं घरीही बघून घ्या असं म्हणाला.
(वाचा - मुलीच्या मृत्यूमुळे कुणीच आधार नाही म्हणून रुग्णालयातून केले बाळाचे अपहरण )
त्यानंतर आरोपी व्यक्ती पीडित महिलेला घर दाखवण्यासाठी सेक्टर 15 मधील आपल्या घरी घेवून गेला. घर दाखवून झाल्यानंतर चहापान करून पीडित महिला निघून आली. परंतु ती भाडेकरार आरोपीच्या घरीच विसरून निघाली. त्यानंतर आरोपीने भाडेकरार घेवून जाण्यासाठी पीडित महिलेला आपल्या घरी बोलावलं. घराचं दार बंद केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी पीडितेनं बलात्कारास विरोध केला तेव्हा आरोपीने पीडितेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच 1 लाख रुपये देवून प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवून घेण्यास दबाबही टाकण्यात आला. सिविल लाईन पोलीस ठाण्याचे प्रमुख बलवंत यांनी सांगितलं की, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पीडित महिलेची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे.