जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रेयसीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळले, संतापात प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

प्रेयसीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळले, संतापात प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

फोटो क्रेडिट - दैनिक भास्कर

फोटो क्रेडिट - दैनिक भास्कर

दोन दिवसांपूर्वी उदयपूरच्या सेमारी भागात दगडाखाली दबलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह (Young Girl Dead Body) सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Accused Arrested) केली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा मृत मुलीचा प्रियकरच निघाला आहे. (Boyfriend Killed his Girlfriend)

  • -MIN READ
  • Last Updated :

उदयपूर, 8 मे : दोन दिवसांपूर्वी उदयपूरच्या सेमारी भागात दगडाखाली दबलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह (Young Girl Dead Body) सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Accused Arrested) केली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा मृत मुलीचा प्रियकरच निघाला आहे. (Boyfriend Killed his Girlfriend) युवतीचे दुसऱ्या मुलीशी लग्न होणार असल्याने तो नाराज होता. त्याच्या प्रेयसीने त्याच्या सोबत लग्न न केल्यामुळे या माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा दाबून हत्या केली. शिवराम मीणा असे आरोपीचे नाव आहे. तो 23 वर्षांचा आहे. तर रेखा मीणा असे मृत तरुणीचे नाव आहे. काय आहे नेमका प्रकार? याप्रकरणी आरोपीने पोलिसांना सांगितले की, मृत रेखासोबत त्याचे मागील एका वर्षापासून प्रेमसंबंध होते. उदयपूरमध्ये दोन्ही सोबत राहत होते. याचवेळी रेखाचा साखरपुडा जयसमंदच्या चंदाजीचा गुडा येथे निश्चित झाला होता. तसेच येणाऱ्या 25 मे ला त्यांचे लग्न होणार होते. मात्र, प्रियकर विनोदला हे लग्न दुसऱ्या कुण्यासोबत होणे मंजूर नव्हते. त्यामुळे विनोदने रेखासोबत बदला घ्यायचा ठरवले. विनोदने कोणत्यातरी प्रकारे रेखाला उदयपूरला भेटायला बोलवले. यानुसार 4 मेला रेखा बसने डिंगरी येथे पोहोचली.

दोघांमध्ये झाले भांडण - 

येथे आरोपी विनोदने रेखाला बाईकवर बसवले आणि तिला घरी घेऊन जाण्याबाबत सांगितले. छोट्या-छोट्या रस्त्यांवरून सायंकाळी 7 वाजता हे दोघे सेमारी तलावाच्या वरच्या भागात पोहोचले. इथे दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी विनोदने सांगितले की, आपण उदयपूरमधील खोली आणि सामानाचा खर्च उचलला आहे. रेखाने त्याचे लग्न मोडले आणि ती दुसऱ्यासोबत लग्न करत आहे. याच वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी प्रियकर विनोदने आपली प्रेयसी रेखाचा तिच्याच ओढणीने गळा दाबून हत्या केली. इतकेच नव्हे तर यानंतर तिच्या मृतदेहावर दगड टाकून दिले.

हेही वाचा -  शाळेत न येता फुकटाचा पगार घेत होती मुख्याध्यापिका, 5000 रुपयांत एका मुलीला ठेवलं; असं समोर आलं प्रकरण

प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. तसेच त्यांनी आरोपी विनोदला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात