मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भयानक! 15 वर्षाच्या मुलाचे 20 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत समलैंगिक संबध, तणावात त्याने उचलले खळबळजनक पाऊल

भयानक! 15 वर्षाच्या मुलाचे 20 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत समलैंगिक संबध, तणावात त्याने उचलले खळबळजनक पाऊल

20 वर्षीय साहिल चौहान मेकअप आर्टिस्टचा कोर्स करत होता.

20 वर्षीय साहिल चौहान मेकअप आर्टिस्टचा कोर्स करत होता.

20 वर्षीय साहिल चौहान मेकअप आर्टिस्टचा कोर्स करत होता.

  • Published by:  News18 Desk
ग्वाल्हेर, 21 सप्टेंबर : मध्यप्रदेश राज्यातील ग्वाल्हेर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये 20 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर त्याच्या खोलीतून सापडलेल्या सुसाईड नोटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुसाईड नोटमध्ये मृताचे त्याच्या 15 वर्षीय मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस कसुन करत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - हा मित्र त्याच्यावर अत्याचार करत होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आहे, असे लिहिले आहे. सुसाईड नोट वाचल्यानंतर पोलीस मृताच्या अल्पवयीन मित्राच्या घरी पोहोचले. मात्र, तो कालपासून बेपत्ता असल्याचे आढळून आले आहे. ही घटना हजीरा येथील तिकोनिया पार्क कांचमिल येथील आहे. येथे राहणारा 20 वर्षीय साहिल चौहान मेकअप आर्टिस्टचा कोर्स करत होता. मंगळवारी रात्री साहिल कोचिंगवरून परतला आणि त्याच्या खोलीत गेला. मात्र, यानंतर तो रात्री उशिरापर्यंत खोलीबाहेर पडला नाही. यामुळे त्याची आई त्याला पाहायला गेली असता त्यांना साहिल फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला. या स्थितीत पाहिल्यानंतर त्याच्या आईने आरडाओरड केला. तसेच यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. हजिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस तपासात मिळालेल्या सुसाईड नोटमुळे खळबळजनक माहिती समोर आली आहे. CSP रवि सिंह भदौरिया यांनी सांगितले की, सुसाइड नोटमध्ये साहिलने जवळच राहणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलाचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले की, त्या मुलाने त्याच्यासोबत दुष्कृत्य केले. तसेच तो त्याचे लैंगिक शोषण करत होता. तसेच त्याने जर त्याचे ऐकले नाही तर तर तो त्याला फसवून टाकेल, अशाप्रकार ब्लॅकमेलही करत होता. तसेच तो सातत्याने माझ्याकडून पैसे घेत होता. पुढे साहिलने लिहिले की, तो मुलगा माझ्या वयापेक्षा कमी वयाचा होता. तसेच माझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, असे मला वाटत असल्याने मी माझे कुणालाच याबाबत सांगू शकत नव्हतो. या संपूर्ण प्रकाराला मी फार त्रासलो आहे. मी त्याच्याकडून माझा बदला घेऊन स्वत: जीवन संपवत आहे. तर सुसाईड नोटमधील मजकूर वाचून पोलिसांनाही धक्का बसला. हेही वाचा - LPU विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला नवा ट्वीस्ट, सुसाईड नोटमध्ये प्राध्यापकाचं नाव यानंतर पोलीस तत्काळ अल्पवयीन मुलाच्या घरी पोहोचले असता तोही मंगळवारी सकाळपासून बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्याचा मोबाईल घरातच सापडला. मुलाच्या कुटुंबीयांनी हजिरा पोलीस ठाणे गाठून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्यांनी मुलाच्या शोधासाठी चार पथके तयार केली. हजिरा येथील संजय नगर येथील जंगल परिसरात त्याची सायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस सातत्याने तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Gwalior

पुढील बातम्या