भोपाळ 25 मे: हेरगिरीच्या संशयावरुन आपल्याच घरात नजरकैदेत असणाऱ्या महूमधील दोन बहिणींची सध्या चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआय (ISI) एजंटच्या जाळ्यात फसलेल्या हिना आणि यास्मिननं आतापर्यंत 2000 हून अधिक मेसेज आणि फोटो पाकिस्नात पाठवले आहेत. दोन दिवसांपासून काही अधिकारी या दोघींची चौकशी (Suspicion of Spying) करत आहेत. पोलिसांनी या तरुणींच्या बहिणीच्या पतीला आणि त्याच्या मुलालाही चौकशीसाठी इंदूर ऑफिसमध्ये बोलावलं आहे. आयबीच्या सूचनेनुसार, इंदूरच्या गुन्हे शाखेनं (Crime Branch) काही दिवसांपूर्वीच गवली पलासियामध्ये राहाणाऱ्या सैन्यातील सेवानिवृत्त सैनिकाच्या मुली यास्मिन आणि हिनाला त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवलं. त्यांची मोठी बहिण, तिचा नवरा आणि मुलगाही घरातच होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिना आणि यास्मिन गेल्या दीड वर्षापासून पाकिस्तानसोबत संपर्कात होत्या. यास्मिननं हेदेखील सांगितलं, की तिला लग्न करायचं होतं आणि याच संबंधी ती बातचीतही करत होती. यास्मिननं पाकिस्तानात जाण्यासाठीही होकार दिला होता. दोन्ही बहिणींना सर्व डेटा डिलीट केला होता. हा डेटा रिकव्हर केला जात आहे. पाकिस्तानातील आठ फोन नंबर मिळाले असून तपासात असं समोर आलं आहे, की यास्मिन पाक सैन्य आणि आयएसआयसाठी चालवल्या जाणाऱ्या कॉल सेंटरमधील युवकांसोबतही बोलत असे. असा संशय व्यक्त केला जात आहे, की पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा नव्या पद्धती वापरुन पाकिस्तानच्या कॉल सेंटरमधून भारतातील महिलांना लग्नासाठी तयार करुन आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे ऑपरेशन आयबीच्या सूचनेनुसार केलं गेलं आहे. मात्र, ही सूचना लीक झाल्यानं अधिकारी नाराज आहेत. त्यांनी संपूर्ण घटनाक्रमाचा एका रिपोर्ट गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे. रिपोर्टमध्ये या तरुणींची संपूर्ण माहिती, मोबाईल नंबर, बँक खात्याचा आयडी आणि पाकिस्तानसंबंधीची सर्व माहिती आहे. रात्री काही पोलीस अधिकारी चौकशीसाठी तरुणींच्या घरी पोहोचले. मात्र, पोलीस तिथे पोहोचताच या तरुणींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर पोलीस खात्यातील महिला टीमनं ही परिस्थिती आटोक्यात आणली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.