भोपाळ 21 मे : कोरोनाच्या संकटकाळात (Corona Pandemic) पोलीस दिवसरात्र एक करुन आपलं कर्तव्य बजावत आहेत. तसंच लोकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचा आणि गर्दी न करण्याचा सल्ला देत आहेत. आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र, अशातच आता समोर आलेली एक घटना केवळ पोलीस खात्यालाच नाही तर माणुसकीलाही काळिमा फासणारी आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यामध्ये एका महिलेनं मास्क परिधान केलं नसल्यानं तिला जाब विचारत महिला कॉन्स्टेबलनं मारहाण केली आहे. इतकंच नाही तर या महिलेला रस्त्यावरच खाली पाडून तिच्या केसांना धरुन ही महिला कॉन्स्टेबल खेचत (Constable Drags Woman for Not Wearing Mask) असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील असून हा व्हिडिओ समोर येताच महिला कॉन्स्टेबलसह सहाय्यक उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित (Woman Constable Suspended) करण्यात आलं आहे.
सागरचे पोलीस अधीक्षक अतुल सिंह म्हणाले की, कॉन्स्टेबल अर्चना दिम्हा हिने महिलेला सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे आणि पोलिसांशी गैरवर्तन केल्याबद्दल ताब्यात घेताना बळाचा वापर करून कायदेशीर प्रक्रियेचा भंग केला. एएसआय एलएन तिवारी यांनीही आपले कर्तव्य योग्य प्रकारे न बजावल्याचे निष्पन्न झाले आहे, असंही अधिकारी म्हणाले.
सागर में मास्क न पहनने के नाम पर पुलिस द्वारा महिला की बर्बर पिटाई बेहद अमानवीय और निंदनीय है। यह आश्चर्यजनक है कि कोविड पीड़ित महिलाओं तक को दुष्कर्म से न बचा पाने वाली प्रदेश पुलिस उल्टे महिलाओं पर ही अपनी 'वीरता' का शर्मनाक प्रदर्शन कर रही है।@ChouhanShivraj pic.twitter.com/Q4PhXpbiWI
— Shobha Oza (@Shobha_Oza) May 20, 2021
सिंग यांनी पुढे सांगितलं की, संबंधित महिला चंचल अहिरवार आणि इतरांवरही सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणण्याकरिता आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आयपीसी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 353, 332, 188, 294, 506 आणि 51 B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की कॉन्स्टेबलसह काही पोलीस कर्मचारी महिलेला मारहाण करीत तिला खाली पाडतात आणि यानंतर केसांना धरुन तिला खेचतात. सागर जिल्ह्यातील राहील गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याच दरम्यान ही महिला विनामास्क बाजारामध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी निघाली होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या मुलीला मास्क न परिधान केल्यामुळे अडवले तेव्हा सुरुवातीला महिलेनं कॉन्स्टेबलला मारहाण केली. राहीलचे पोलीस उपविभागीय अधिकारी कमल सिंग यांनी सांगितले की, या व्हिडिओमध्ये संपूर्ण घटना कैद झाली नाही, तर घटनेची केवळ एक बाजू कैद झाली आहे. या महिलेनं आधी महिला पोलिसावर हल्ला करत आपल्या नखांनी पोलिसाच्या चेहऱ्यावर जखमा केल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी त्यांना मास्क परिधान न केल्यानं शिक्षा खुल्या कारागृहात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनी यासाठी नकार दिला आणि हवालदाराला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack on police, Mask, Shocking video viral, Woman police