जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Night Club मधील गोंधळात 19 ठार; अगोदर चाकू हल्ला, मग भडकली आग

Night Club मधील गोंधळात 19 ठार; अगोदर चाकू हल्ला, मग भडकली आग

Night Club मधील गोंधळात 19 ठार; अगोदर चाकू हल्ला, मग भडकली आग

इंडोनेशियात दोन गटांमध्ये धार्मिक आणि वांशिक मुद्द्यांवरू झालेल्या हाणामारीत आणि त्यानंतर लागलेल्या आगीत 19 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोरोंग, 25 जानेवारी: इंडोनेशियाच्या (Indonesia) सोरोंग (Sorong) शहरातील एका नाईट क्लबमध्ये (Night Club) अगोदर झालेला खुनी हल्ला (Stabbing) आणि त्यानंतर लागलेल्या आगीत (Fire) आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू (19 dead) झाला आहे. दोन गटांमध्ये झालेल्या भांडणानंतर हाणामारी आणि खुनी हल्ल्यांना सुरुवात झाली आणि त्यानंतर काही क्षणांतच नाईट क्लबच्या इमारतीने पेट घेतला. ही आग नेमकी कुणी आणि कशी लावली, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या सगळ्या घटनाक्रमात एकूण 19 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती समोर आली आहे. दोन गटांत भांडण इंडोनेशियातील सोरोंग शहरातील एका नाईट क्लबमध्ये वंशवादावरून दोन वेगवेगळ्या गटांमध्ये वादाला सुरुवात झाली. शब्दाला शब्द वाढत गेला आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले. एका गटातील व्यक्तीने दुसऱ्या गटातील एकावर थेट चाकूने हल्ला केला. हा वार वर्मी लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दुसरा गट खवळला आणि त्यांनी पहिल्या गटावर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर उडालेल्या धुमश्चक्रीत तुंबळ हाणामारीला आणि जाळपोळीला सुरुवात झाली. अनेकांनी नाईट क्लबच्या इमारतीलाच लक्ष्य करून आपला राग व्यक्त केल्याने इमारतीच्या एका भागाने पेट घेतला. पाहता पाहता ही आग भडकली आणि पूर्ण नाईट क्लबची इमारतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीत 18 जणांचा मृत्यू या आगीत एकूण 18 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती इंडोनेशिया प्रशासनानं जाहीर केली आहे. इमारतीला लागलेली आग इतकी भयंकर होती की त्यात अनेकजण होरपळले. स्थानिक पोलिसांनी दोन्ही गटांच्या धर्मगुरुंना फोनवरून संपर्क साधत दोन्ही गटांना शांततेचं आवाहन करण्याची विनंती केली. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्यामुळे याचा देशातील इतर भागांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्वांना शांतता पाळण्याचं आवाहन करण्यात आलं. हे वाचा- लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी ब्रिटीशांचे दरवाजे पुन्हा खुले, असे बदलले नियम गैरसमजातून गोंधळ एकमेकांविषयी झालेल्या गैरसमजातून दोन्ही गट एकमेकांशी भिडल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. इंडोनेशियातील सोरोंग हा भाग शांतताप्रिय म्हणून प्रसिद्ध आहे. गैरसमजातून झालेल्या या भांडणात 19 जणांना नाहक आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा स्थानिक पोलिसांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , fire , indonesia
  • First Published :
जाहिरात
जाहिरात