लखनऊ 17 जुलै : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात निष्काळजीपणामुळे एका मुलाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील फतेहपूर चौरासी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शनिवारी सकाळी सेल्फी घेताना एका मुलाचा मृत्यू झाला (Boy Died while Taking Selfie). हा मुलगा आपल्या बेडरूममध्ये मोबाईलमधून रिव्हॉल्व्हरसोबत सेल्फी घेत होता (Selfie With Revolver), त्यादरम्यान अचानक रिव्हॉल्व्हरच्या ट्रिगरवर बोट गेल्याने गोळी सुटली आणि मुलाचा मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून घरात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी तरुणाच्या खोलीत धाव घेतली, तिथे त्यांना मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
कोल्डड्रिंक देऊन बेशुद्ध केलं, नंतर मैत्रिणीच्या मित्राचं विवाहितेसोबत धक्कादायक कृत्य
तात्काळ कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेलं असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली असून, कुटुंबीय आक्रोश करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, फतेहपूर चौरासी पोलीस ठाण्याच्या काजीपूर बांगर गावातील इंद्रेश यांचा १७ वर्षीय मुलगा सकाळी घरात त्याच्या खोलीत होता. घरात ठेवलेल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरसह बंद खोलीत सेल्फी घेत असताना, अचानक रिव्हॉल्व्हरच्या ट्रिगरला हात लागला आणि यातील गोळी त्याच्या कपाळावर लागली. गोळीचा आवाज ऐकताच घरात असलेली आई आणि भाऊ त्याच्या खोलीकडे धावले, यावेळी त्यांना सूचित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
कुटुंबीयांनी घाईघाईने त्याला उचलून कानपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन आधी पत्नीची हत्या, दोन दिवसांनी भावालाही संपवलं अन् नंतर..
या संपूर्ण प्रकरणात सफीपूरचे सीओ अंजनी कुमार राय यांनी सांगितलं की, सकाळी एका मुलाने परवाना असलेल्या आपल्या वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडल्याची बातमी आली. कुटुंबाने त्याला रुग्णालयात नेलं, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, पोलीस तपासात गुंतले आहेत.. गोळीबाराचे कारण लवकरच समजेल, असं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gun firing, Selfie