मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अपहरण झालेल्या नातीचा आजोबांना दीड वर्षानं आला फोन, तिचे हाल ऐकून पायाखालची जमीनच सरकली

अपहरण झालेल्या नातीचा आजोबांना दीड वर्षानं आला फोन, तिचे हाल ऐकून पायाखालची जमीनच सरकली

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

Crime News: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल येथून दीड वर्षांपूर्वी एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण (Minor Girl kidnapping) करण्यात आलं होतं. गेली अनेक महिन्यांपासून तिचे आजोबा तिला अनेक ठिकाणी शोधत होते. पण तिचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

जळगाव, 21 मे: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल येथून दीड वर्षांपूर्वी एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण (Minor Girl kidnapping) करण्यात आलं होतं. गेली अनेक महिन्यांपासून तिचे आजोबा तिला अनेक ठिकाणी शोधत होते. पण तिचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. पण अपहरण झाल्यानंतर दीड वर्षांनी पीडित मुलीनं फोन करून आपल्या आजोबांशी संवाद साधला आहे. यावेळी तिनं आपल्या आजोबांना तिचा उत्तर प्रदेशातील पत्ता सांगितला आहे. यानंतर पोलीस संबंधित मुलीच्या शोधात तिनं सांगितलेल्या पत्त्यावर रवाना झाले आहेत.

संबंधित 65 वर्षीय फिर्यादी आजोबांचं नाव भिमसिंग गंगाराम कोळी असून ते यावलमधील धोबीपाडा येथील रहिवासी आहेत. 19 नोव्हेंबर 2019 रोजी फिर्यादीची 11 वर्षांची नात अचानक गायब झाली होती. ती गायब झालेल्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत गेली होती. यावेळी वर्गात दप्तर ठेवल्यानंतर काही कामानिमित्त बाहेर आली होती. तेव्हाच एका अनोळखी व्यक्तीनं तिला रिक्षात बसवून तिचं अपहरण केलं होतं.

या घटनेनंतर तिला सर्वत्र शोधण्यात आलं. पण तिचा काही थांगपत्ता सापडला नाही. शेवटी निराश होऊन हार पत्करण्याची वेळ आली होती. तर पीडितेच्या आजीचं तर मानसिकताचं बिघडली होती. अशा स्थितीत 24 एप्रिल रोजी संबंधित अपहरण झालेल्या मुलीनं आपल्या आजोबांना संपर्क साधला आहे. दैनिक पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, 24 एप्रिल रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास पीडित मुलीचा आजोबांना फोन केला होता. यावेळी तिनं सांगितलं की, मी उत्तर प्रदेशातील नवीनसिंग उर्फ गुड्ड रामा शंकरसिंग नावाच्या व्यक्तीसोबत असून तो बलकजगंज देरवा चौक, सरकारी दवाखान्यामागे गोरखपुर याठिकाणचा रहिवासी आहे.

हे ही वाचा-हृदयद्रावक! सॉरी बाबा, सासरी येऊन चूक केली; व्हिडिओ शेअर करत तरुणीची आत्महत्या

संबंधित आरोपीनं तुझ्या वडिलांकडं सोडतो असं सांगुन तिला भुसावळ येथून रेल्वेनं उत्तर प्रदेशात नेल्याचं तिनं सांगितलं आहे. या सर्व घटनेची माहिती पीडितेनं आपल्या आजोबांना सांगितल्यानंतर त्यांनी यावल पोलीस ठाण्यात आपल्‍या नातीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेतली असून प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन यावल पोलीस पीडितेच्या शोधात उत्तर प्रदेशात रवाना झाले आहेत.

First published:

Tags: Jalgaon, Kidnapping, Small girl, Uttar pradesh