Home /News /coronavirus-latest-news /

WHO चा कोरोना प्रसाराबद्दल अजब दावा, चीनची केली जातीये पाठराखण?

WHO चा कोरोना प्रसाराबद्दल अजब दावा, चीनची केली जातीये पाठराखण?

कोरोनाचा प्रसार नेमका कसा झाला, याबद्दल तपासणी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOची टीम वुहानमध्ये गेली आहे. या टीमकडून कोरोनाबाबतचा मोठा खुलासा होईल, अशी अपेक्षा असतानाच या टीमनं मात्र चीनची पाठराखण केल्याचं समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 10 फेब्रुवारी : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा (Coronavirus) प्रसार हा चीनच्या वुहानमधून(Wuhan) झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार नेमका कसा झाला, याबद्दल तपासणी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOची टीम वुहानमध्ये गेली आहे. या टीमकडून कोरोनाबाबतचा मोठा खुलासा होईल, अशी अपेक्षा असतानाच या टीमनं मात्र चीनची पाठराखण केल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा प्रसार चीनमधून झाला नसल्याचा दावा, या टीमनं केला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि चीनच्या संयुक्त अभ्यास पथकाचे सदस्य लियांग वानियन यांनी या प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. वुहानमध्ये डिसेंबर 2019च्या आधी कोरोनाचा प्रसार झाल्याचा तसंच हा रोग प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, याबाबतच्या इतर शक्यताही पडताळून पाहायला हव्या असंही जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं म्हटलं आहे. मंगळवारी न्यूयॉर्कमधील जंतुशास्त्रज्ञ पीटर दासझाक म्हणाले होते की, सध्या आम्ही सर्व गोष्टी एकत्रित करण्याचा आणि कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. विषाणूचा प्रसार झाल्यानंतर वुहान फूड मार्केट बंद केलं गेलं. यावेळी लोक घाईघाईनं पळत सुटले. त्यांनी आपली उपकरणं आणि सामान तिथंच सोडलं. त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचा पुरावाही त्यांनी तसाच सोडला आणि आम्ही त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या या माहितीमुळं कोरोनाच्या उत्क्रांतीचं कारण लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा असतानाच समोर आलेलं लियांग वानियन यांचं विधान म्हणजे चीनची पाठराखण असं म्हटलं जात आहे. चीनच्या हुबेई येथे नोव्हेंबर 2019मध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता, मात्र, चीननं याबद्दल कोणालाही माहिती दिली नव्हती. आता कोरोनाच्या प्रसारानंतर जवळपास दीड वर्षानंतर जागतिक आरोग्य संघटनेचं पथक कोरोनाची उत्पत्ती आणि त्याची कारणं शोधण्यासाठी चीनमध्ये दाखल झालं आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसविरोधात (coronavirus) सध्या लस (corona vaccine) उपलब्ध झाली आहे, पण यासाठी तब्बल वर्षभर प्रतीक्षा करावी लागली. त्यात आता कोरोना आपली रुपं सातत्यानं (coronavirus mutation) बदलतो आहे. तरीही काही कोरोना लशी या नव्या रुपांविरोधात प्रभावी ठरत असल्याचं सांगितलं जातं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: China, Coronavirus, Who, Wuhan

    पुढील बातम्या