जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / लस घेतलेल्यांसाठी स्मार्ट डिजिटल प्रमाणपत्रावर काम करतय WHO, प्रवासासाठी असणार अनिवार्य?

लस घेतलेल्यांसाठी स्मार्ट डिजिटल प्रमाणपत्रावर काम करतय WHO, प्रवासासाठी असणार अनिवार्य?

लस घेतलेल्यांसाठी स्मार्ट डिजिटल प्रमाणपत्रावर काम करतय WHO, प्रवासासाठी असणार अनिवार्य?

क्लूगे म्हणाले, की हे सर्टिफिकेट (Smart Digital Certificate) वॅक्सिन पासपोर्टपेक्षा वेगळं असणार आहे. लस घेतल्यानंतर लोकांकडे यासंबंधीचे डॉक्यूमेंटेशन डिजीटल किंवा कागदपत्राच्या स्वरुपात असायला हवे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 मार्च : जागतिक आरोग्य संघटना सध्या स्मार्ट डिजीटल सर्टिफिकेटवर (Smart Digital Certificate) काम करत आहे. संघटनेचे एक अधिकारी हैंस क्लूगे यांनी सांगितलं, की आमची अशी इच्छा आहे, की लस घेतलेल्या लोकांनी डॉक्यूमेंट नक्की तयार करावं. त्यांनी हेदेखील सांगितलं की हे वॅक्सिन पासपोर्टपेक्षा वेगळं आहे. सोबतच याची पुढे अनेक ठिकाणी गरज भासू शकते. क्लूगे म्हणाले, की हे सर्टिफिकेट वॅक्सिन पासपोर्टपेक्षा वेगळं असणार आहे. आपण आताच हे नाही म्हणू शकत की आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लसीकरण गरजेचं आहे. आताच अशी अट ठेवता येणार नाही. मात्र, लस घेतल्यानंतर लोकांकडे यासंबंधीचे डॉक्यूमेंटेशन डिजीटल किंवा कागदपत्राच्या स्वरुपात असायला हवे. मात्र, डिजीटल स्वरुपाला त्यांनी अधिक पसंती दर्शवली आहे. वॅक्सिन पासपोर्ट आणि डिजीटल पासपोर्ट वेगळंवेगळं ठेवण्यामागचं कारण क्लूगे यांनी लसींची कमी असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आता लसीकरण केलेल्याच लोकांना प्रवास करण्यास परवानगी दिली तर जगभरात लसीकरणाच्या प्रक्रियेत गोंधळ होईल. याचा सर्वाधिक परिणाम कमजोर लोकांवर होईल. सध्या जगभराच विमानांची आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची व्यवस्य़ा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे प्रवाशांना त्यांच्या देशाकडून लसीकरणाचं सर्टिफिकेट आणि प्रवासाटी परवानगी यासारखे कागदपत्र अनिवार्य केले जाऊ शकतात. अनेक देशांमध्ये या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. हे कागदपत्र ई फॉरमॅट किंवा डिजीटल फॉरमॅटमध्ये असतील. यालाच वॅक्सिन पासपोर्टही म्हटलं जात आहे. अशी पद्धत लागू करणारा इज्राइल पहिला देश ठरला आहे. याठिकाणी त्याला ग्रीन पासपोर्ट म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात