Home /News /coronavirus-latest-news /

निष्काळजीपणाचा बळी! Covid Test करताना किट अडकलं घशात; अर्धा तास तडफडतच महिलेचा मृत्यू

निष्काळजीपणाचा बळी! Covid Test करताना किट अडकलं घशात; अर्धा तास तडफडतच महिलेचा मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

कोरोनाची चाचणी करण्यासाठी ही महिला घरातून निघाली होती. मात्र निष्काळजीपणामुळे तिचा जीव गेला.

  बिहार, 18 सप्टेंबर : देशभरात कोरोनाच्या (Corona Virus in India) महामारीमुळ लाखो लोकांचा जीव गेला आहे. अद्यापही कोरोनाची महासाथीची टांगती तलवार असून तिसऱ्या लाटेत (Third wave Of Corona) पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोना महासाथीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना तपासणीदरम्यान निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. या मुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. कोरोना टेस्ट करताना किटमधील दांडी महिलेच्या गळ्यात अडकली. यानंतर अर्धा तास महिला तडफडत राहिला व त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना बिहारची राजधानी पाटना या भागात घडल्याचं सांगितलं जात आहे. (Woman dies after kit gets stuck while testing corona In bihar) मिळालेल्या माहितीनुसार, राम बहाद्दूर दार यांची 65 वर्षीय पत्नी जासो देवी या कोरोनाची टेस्ट करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तोंडात तपासणीसाठी किट घालण्यात आलं तेव्हा ते गळ्यामध्येच अडकलं, अशी माहिती मृत महिलेचे पती राम बहाद्दूर दास यांनी दिली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, वैद्यकीय व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळला आहे. हे ही वाचा-प्रेग्नंट महिलांवर कोरोनाचा होतोय भयंकर परिणाम; महाराष्ट्रातील धक्कादायक रिपोर्ट जासो देवी या कोरोनाची चाचणी करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांच्या तोंडात कोरोना चाचणी किट घालण्यात आलं. मात्र ते तोंडातच अडकलं. यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यातच त्या बेशुद्ध पडल्या. यानंतर तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आलं. मात्र डॉ. कमलेश कुमार यांनी टेस्टदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा नकार दिला आहे.
  नागरिकांनो दुर्लक्ष नको... इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डायरेक्टर बलराम भार्गव यांनी म्हटलं की, कोरोनाविरोधात राज्यांकडून पावले उचलली जात आहेत. केरळसारख्या राज्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी इतर राज्येही यशस्वी होतानाच चित्र आहे. तरीही आपल्याला माहित आहे की सण जवळ येत आहेत आणि गर्दी जास्त असल्याने व्हायरस पसरण्यास मदत होते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
  कोरोनाबाबत कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही के पॉल म्हणाले- 'देशभरात कोविडची परिस्थिती आता स्थिर होत आहे. पण मिझोराम राज्य चिंतेचा विषय बनला आहे. येणारे तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असतात, जेव्हा सणांचा कालावधी येतो. विशेषतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. जर परिस्थिती आता स्थिर असेल तर ती कायम ठेवावी लागेल. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि राज्यांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहावे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bihar, Corona patient, Covid kit, Shocking news

  पुढील बातम्या