Home /News /coronavirus-latest-news /

प्रेग्नंट महिलांवर कोरोनाचा होतोय भयंकर परिणाम; महाराष्ट्रातील धक्कादायक रिपोर्ट

प्रेग्नंट महिलांवर कोरोनाचा होतोय भयंकर परिणाम; महाराष्ट्रातील धक्कादायक रिपोर्ट

राखाडी रंगाचा स्त्राव होणं. योनी मार्गातील इन्फेक्शनचं लक्षण आहे. यालाच बॅक्टेरियल वेजाइनोसिस म्हटलं जातं. गर्भावस्थेच्या काळात असा रक्तस्त्राव होणं गर्भापातचं लक्षण असू शकतं.

राखाडी रंगाचा स्त्राव होणं. योनी मार्गातील इन्फेक्शनचं लक्षण आहे. यालाच बॅक्टेरियल वेजाइनोसिस म्हटलं जातं. गर्भावस्थेच्या काळात असा रक्तस्त्राव होणं गर्भापातचं लक्षण असू शकतं.

प्रेग्नंट महिलांना कोरोना विषाणूमुळे गंभीर स्वरूपाचा आजार होण्याचा धोका (Corona risk during pregnancy) असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

मुंबई, 18 सप्टेंबर : जगासह देशातला कोरोना (Coronavirus) संसर्ग हे चिंतेचं कारण बनलं आहे. कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिएंट (Corona Variant) सातत्याने आढळून येत असल्यानं लोकांमध्ये संसर्ग वेगात पसरू शकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) वतीने एक संशोधन (Research) करण्यात आलं. यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. प्रेग्नंट महिलांना (Pregnant Women) कोरोना विषाणूमुळे गंभीर स्वरूपाचा आजार होण्याचा धोका (Corona risk during pregnancy) असून, अशा स्थितीत त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते, असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे (Corona infection during pregnancy). कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गर्भवती महिलांना वेळेआधी प्रसूती (Corona cause Premature Delivary) आणि अत्याधिक तणावाचा (Stress) धोका असल्याचं इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटलं आहे. कोरोनासोबतच अॅनिमिया, टीबी आणि मधुमेहासारख्या आजारांमुळे गर्भवती आणि बाळाला नुकताच जन्म दिलेल्या महिलांमध्ये मृत्यूचा (Death) धोका वाढू शकतो, असं या संशोधनात म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान कोविड-19चा (Covid-19) संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांमध्ये कोणते परिणाम दिसून आले, याबाबतचं विश्लेषण या संशोधनात करण्यात आलं आहे. यासाठी महाराष्ट्रातल्या 19 वैद्यकीय महाविद्यालयांमधून कोविड-19चा संसर्ग झालेल्या गर्भवती आणि बाळाला जन्म दिलेल्या महिलांविषयी माहिती जमा करण्यात आली. हे वाचा - Explainer - 86.64% नागरिकांमध्ये Corona Antibodies; मुंबईला Herd immunity मिळाली का? मार्च 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान जमा केलेल्या 4203 गर्भवती महिलांच्या माहितीचं विश्लेषण या संशोधनात करण्यात आलं आहे. यात 3213 जन्म दिलेल्या, 77 गर्भपात झालेल्या, 834 अविवाहित गर्भधारणा झालेल्या महिलांचा समावेश होता. मृत बाळाच्या जन्मासह गर्भावस्था / गर्भपात टक्केवारी 6 टक्के होती. यात 534 महिलांमध्ये (सुमारे 13 टक्के) कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यापैकी 382 (सुमारे 72 टक्के) महिलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं होती. 111 महिलांमध्ये (सुमारे 21 टक्के) मध्यम, तर 40 महिलांमध्ये (सुमारे 7.5 टक्के) गंभीर स्वरूपाची लक्षणं होती. यात सर्वांत जास्त आढळून आलेली समस्या म्हणजे वेळेआधी प्रसूती होणं. अशी 528 प्रकरणं सापडली. गर्भधारणेच्या काळात उच्च रक्तदाबग्रस्त महिलांची संख्या 328 होती. 158 गर्भवती, तसंच बाळाला जन्म दिलेल्या महिलांना अधिक देखभालीची गरज होती. त्यातल्या 152 महिलांना कोविड-19 शी संबंधित त्रास जाणवत होता. या सर्व प्रकरणांमध्ये मृत्यूदर (CFR) 0.8 टक्के दिसून आला. महाराष्ट्रात पुण्यात सीएफआरचा दर सर्वाधिक होता. पुण्यात हा दर 9/1155, मुंबई उपनगरांत 11/1684, मराठवाड्यात 4/351, तर खानदेशात 1/160 असा होता. हे वाचा - ICU मध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना किडनी फेल होण्याचा धोका कोरोना विषाणूमुळे गर्भवती महिलांना संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे मध्यम ते गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग झालेल्या महिलांना तत्काळ उपचारांची गरज आहे.
First published:

Tags: Coronavirus, Pregnancy, Pregnant woman

पुढील बातम्या