Home /News /coronavirus-latest-news /

विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी Online Classes ठरतायंत कठीण, चिमुरड्यांसाठी कोरोना काळ आहे आव्हानात्मक

विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी Online Classes ठरतायंत कठीण, चिमुरड्यांसाठी कोरोना काळ आहे आव्हानात्मक

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणपद्धतीमुळे शैक्षणिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्यादेखील मुलांना खूप मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत तर विशेष गरजा असलेल्या मुलांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करणंही कठीण आहे.

    मुंबई, 29 जानेवारी: कोरोना साथीमुळे (Coronavirus Pandemic) गेल्या दोन वर्षांत अनेक बदल झाले. सगळ्यांना अनेक नवीन गोष्टींशी जुळवून घ्यावं लागलं. सगळीकडे ऑनलाइनचा बोलबाला झाला. सगळ्यात मोठा बदल झाला तो तर शिक्षण क्षेत्रात. देशाचं भविष्य असणाऱ्या मुलांना कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्यापासून वाचविण्यासाठी शाळा, कॉलेज बंद ठेवण्याची वेळ आल्यानं शिक्षणही ऑनलाइन (Online Education) झालं. अनेक अडथळे, समस्या यावर मात करत मुलं, शिक्षक,पालकही ऑनलाइन शिक्षणाला सरावले. कोरोनाची पहिली, दुसरी लाट ओसरल्यानंतर तसंच लसीकरण झाल्यामुळं धोका काहीसा कमी झाल्यानं काही निर्बंध पाळत मुलांना प्रत्यक्ष शाळेत, कॉलेजात जाण्याचा अनुभवही काही काळ घेता आला, पण कोरोनाचा धोका पूर्णपणे संपला नसल्यानं अद्यापही ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या सगळ्याचा शैक्षणिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्यादेखील मुलांना खूप मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत तर विशेष गरजा असलेल्या मुलांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करणंही कठीण आहे. सगळी मुलं खासच असतात, पण ज्या मुलांना शारीरिक, बौद्धिकदृष्ट्या अपंगत्व आलेलं असतं, त्यांना मदतीची गरज असते अशा मुलांचा उल्लेख विशेष गरजा (Special Needs Children) असलेली मुलं असा केला जातो. या कोरोना साथीच्या काळात सगळ्याचं मुलांना घरात राहावं लागलं आहे. त्यांच्यासाठी या परिस्थितीशी जुळवून घेणं खूप कठीण आहे. या काळात विशेष मुलांना तर प्रचंड आव्हानांना तोंड द्यावं लागत असून त्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्याविषयी काही मुद्द्यांवर टाकलेला हा प्रकाश हे वाचा-बेशुद्धावस्थेतच 6 महिने कोरोनाशी झुंज, मृत्यूवर मात; डॉक्टर म्हणाले, हा चमत्कार सहवास विशेष गरजा असलेल्या मुलांना स्पर्श, गंध, आवाज यांची ओढ असते. ओळख असते. त्यांना दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींसाठी मदतीची गरज असते. आपली काळजी घेणाऱ्या घरातील व्यक्ती म्हणजे आई-वडील, आजी-आजोबा किंवा अन्य तसंच कोणी मदतनीस असतील किंवा शाळेत जात असतील तर तिथले शिक्षक, कर्मचारी यांची त्यांना सवय असते. त्यांचा आजूबाजूला असणारा वावर त्यांना स्थिरता, सुरक्षिततेची जाणीव करून देत असतो. यातील अनेक गोष्टींपासून या मुलांना या काळात वंचित रहावं लागलं. नेहमीची माणसं समोर स्क्रीनवर दिसतायत मात्र त्यांना हात लावता येत नाही, हे समजून घेणं त्याच्यासाठी कठीण होतं. सामाजिक संवाद कोरोनापूर्व काळात शाळेत जाणारी ही मुलं या काळात घरात स्क्रीनवर शाळा बघू लागली. आपल्या मित्रमैत्रिणीना भेटता येत नाही, समोर ती दिसत आहेत, मात्र त्यांच्याशी खेळता येत नाही, स्पर्श करता येत नाही, हे सगळं त्यांच्यासाठी अनाकलनीय होतं. सर्वसाधारण मुलांच्या शाळा गेल्या आठवड्यापासून सुरू झाल्या आहेत, तेव्हा आपल्या मित्रमैत्रीणींना प्रत्यक्ष बघून, त्याला भेटून झालेला आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असल्याचं अनेकांनी अनुभवलं असेल. पण विशेष मुलांसाठी अद्याप ही संधी दुर्मीळ आहे, असं वाटतं. हे वाचा-कोरोना संक्रमित आईकडून स्तनपानातून बाळाला संसर्ग होऊ शकतो का? समवयस्कांची भेट विशेष मुलांसाठी त्यांच्या मित्र -मैत्रिणींचा सहवास खूप महत्त्वाचा असतो. आपल्या समवयस्क मित्र-मैत्रीणींकडून ही मुलं आपोआप खूप काही शिकत असतात. वागण्या-बोलण्याच्या पद्धती आत्मसात करण्यासाठी त्यांना आपल्या समवयस्क मित्र-मैत्रीणींची खूप गरज असते. त्यांच्या बरोबर वागताना, बोलताना ते मोकळे असतात, त्यांना कसलं दडपण जाणवत नाही. रुटिन विशेष मुलांना त्यांच्या एका ठराविक रुटीनची सवय असते. त्यात झालेला छोटासा बदलही त्यांच्यासाठी त्रासदायक असतो. उदाहरणार्थ, ऑनलाइन शिकत असताना अचानक लाईट गेले तर त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्यांचं लक्ष विचलीत होतं, अशावेळी त्याचं लक्ष अभ्यासात परत आणणं हे शिक्षकांसाठी आणि आई-वडिलांसाठीदेखील मोठं कठीण काम असतं. हे वाचा-महाराष्ट्रातील मास्क सक्ती हटवणार? मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी ऑनलाइन शिकत असताना आजूबाजूला घडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी या मुलांचे लक्ष विचलित करतात. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणं शक्य नसतं. एकंदर, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी तर हा कोरोना साथीचा काळ अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. या मुलांच्या समस्यांची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे.
    First published:

    Tags: Corona, Covid-19

    पुढील बातम्या