मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Omicron की Delta तुम्हाला कोणत्या प्रकाराची लागण झाली? ही आहे ओळखण्याची पद्धत

Omicron की Delta तुम्हाला कोणत्या प्रकाराची लागण झाली? ही आहे ओळखण्याची पद्धत

corona

corona

जोधपूर स्थित NIIRNCD (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इम्प्लीमेंटेशन रिसर्च ऑन नॉन-कम्युनिकेबल डिसीजेस) चे संचालक आणि सामुदायिक औषध विशेषज्ञ डॉ. अरुण शर्मा म्हणतात की RTPCR चाचणीत कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला कोणता प्रकाराने संक्रमित केलंय हे कळत नाही. मग तुम्ही कसं ओळखणार?

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 14 जानेवारी : भारतात कोरोना (Coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) आल्यानंतर संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे भारतातील बहुतांश रुग्णांनाही या प्रकाराची लागण होण्याची शक्यता आहे. मात्र, रुग्णांच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग केल्याशिवाय याबाबत ठोस सांगता येत नाही. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतात जीनोम सिक्वेन्सिंग सुविधा नसल्यामुळे खूप कमी जणांच्या व्हेरियंटची चाचणी केली जात आहे. बाकी लोकांच्या व्हेरिएंटबद्दल फक्त अंदाज लावला जाऊ शकतो. जर तीन गोष्टींचा विचार केला तर, देशातील कोविड पॉझिटिव्ह लोकांना देखील त्यांना कोणत्या प्रकाराची लागण झाली आहे याचा अंदाज लावता येईल.

जोधपूर स्थित NIIRNCD (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इम्प्लीमेंटेशन रिसर्च ऑन नॉन-कम्युनिकेबल डिसीजेस) चे संचालक आणि सामुदायिक औषध विशेषज्ञ डॉ. अरुण शर्मा म्हणतात की RTPCR चाचणीत कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला कोणता प्रकाराने संक्रमित केलंय हे कळत नाही. ते डेल्टा असो वा ओमिक्रॉन असो किंवा इतर कोणत्याही प्रकाराने संक्रमित झाले असले, तरी ते केवळ जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये शोधले जाते.

उदाहरणार्थ, समजा RTPCR द्वारे देशात दररोज दोन लाख कोविड प्रकरणे येत आहेत. परंतु,ओमिक्रॉन किंवा इतर कोणत्याही प्रकाराची चाचणी घेण्यासाठी केवळ 10 हजार नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी जात आहेत. अशा स्थितीत उर्वरित 1 लाख 90 हजारांमध्ये डेल्टा आहे की ओमिक्रॉन, हे कळणार नाही. मात्र, या तिन गोष्टींच्या आधारे भारतात कोणत्या प्रकारामुळे जास्त संक्रमित होत आहेत, हे निश्चित करता येईल.

जीनोम सिक्वेन्सिंग डेटामधून व्हेरिएंटचा अंदाज

डॉ. अरुण सांगतात की, भारतात अगदी कमी नमुने जरी जीनोम सिक्वेन्सिंग करत असले, तरी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी येणाऱ्या सर्व केसेसपैकी जवळपास 80 टक्के केसेसमध्ये कोरोनाचे ओमिक्रॉन व्हेरिएंट असल्याची पुष्टी होत आहे. कारण हे नमुने सिक्वेन्सिंगसाठी रँडमली घेतले जातात. म्हणजेच जिथे अचानक कोरोनाचे जास्त केसेस समोर येतात, तिथून काही नमुने प्रकार तपासण्यासाठी घेतले जातात. अशा परिस्थितीत, भारतातील बहुतेक रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत असे थेट म्हणता येणार नाही. परंतु, आकडेवारीच्या आधारे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे अंदाज

डॉ. शर्मा म्हणतात की भारतातील बहुतेक रुग्णांमध्ये ओमिक्रॉनचा (Omicron) पुष्टी करणारा दुसरा घटक म्हणजे या प्रकाराचा संसर्ग दर. आतापर्यंतच्या डेटानुसार ओमिक्रॉन 70 टक्के जास्त संसर्गजन्य आणि पूर्वी नोंदवलेल्या प्रकारांपेक्षा वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. हा हवेतून अधिक लोकांना संक्रमित करू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही मागील आकडे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की डेल्टा व्हेरियंटच्या काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत आठवडाभरात एवढी वाढ झालेली नाही. अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत, कोरोनाची प्रकरणे दुप्पट किंवा तिप्पट होत नाहीत. त्यामुळे, या आधारावर असेही म्हणता येईल की, यावेळी केवळ ओमिक्रॉन प्रकारच देशात ठळकपणे संसर्ग पसरवत आहे.

Corona: पुणेकरांनो मुलांची काळजी घ्या, गेल्या 6 दिवसातील धक्कादायक आकडेवारी समोर

या वेळी रोगाची लक्षणे देखील सौम्य

डॉ. शर्मा सांगतात की एप्रिल ते जून 2021 च्या तुलनेत यावेळी कोरोनामुळे सौम्य लक्षणे समोर येत आहेत. उदाहरणार्थ ताप, सर्दी, खोकला, सर्दी, अंगदुखी किंवा डोकेदुखी हे एक-दोन दिवसांपासून दिसून येत आहे. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या वेळी मध्यम किंवा गंभीर रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. विशेष म्हणजे ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे अतिशय सौम्य असल्याचे जगभर समोर येत आहे, तर डेल्टामध्ये उलट्या, जुलाब, धाप लागणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे, बीपी कमी होणे अशा समस्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीत असे गृहीत धरले जाऊ शकते की यावेळी भारतात संसर्ग होण्याचे मुख्य कारण ओमिक्रॉन आहे.

सामान्य लोकांना कसं समजणार?

डॉ. शर्मा म्हणतात की जीनोम सिक्वेन्सिंगमुळे रुग्णाला कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली हे समजते. मात्र, वर नमूद केलेल्या या तीन गोष्टींच्या आधारे सामान्य लोक अंदाज लावू शकतात की त्यांना कोणत्या प्रकाराचा संसर्ग होत आहे. विशेषत: ओमिक्रॉनच्या लक्षणांच्या आधारे हे सांगितले जाऊ शकते की कोरोना विषाणूचा कोणता प्रकार त्यांच्यावर परिणाम करत आहे.

येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की लोकांमध्ये कोणताही प्रकार असला तरीही RTPCR मध्ये कोविड पॉझिटिव्ह असतील तर त्यांनी नमूद केल्याप्रमाणे सर्व खबरदारी घ्यावी लागेल. डेल्टा असो वा ओमिक्रॉन, कोविड नियमांचे वर्तन कधीही सोडू नका. पॉझिटिव्ह असल्यास आयसोलेशनमध्ये राहा. लक्षणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ऑक्सिजनची पातळी तपासली पाहिजे जेणेकरून कोणतीही समस्या उद्भवू नये. ताप किंवा श्वासोच्छवासाची समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

First published:

Tags: Corona, Delta virus, Omicron