वुहान 27 जानेवारी : चीनच्या हुबेई राज्यातील वुहानमध्ये कोरोनाग्रस्त (coronavirus) परिवारातील एक व्यक्ती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रतिनिधींना भेटून काहीतरी सांगू इच्छित आहे. पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे, की चिनी सरकारनं त्यांचा आवाज दाबला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, WHO च्या प्रतिनिधींना अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर वुहान दौरा करण्याची परवानगी देण्यात आली होती.
वुहानमधून झाला होता कोरोनाचा प्रसार -
वुहानमधून कोरोनाचा (Corona in China) पहिला रुग्ण समोर आला होता. यानंतर चीनने या शहरात 70 दिवसांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊन(lockdowin in china) केलं होतं. आता WHOची टीम पीडित कुटुंबासोबत बोलू शकेल की नाही, याबद्दल चीनने अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत. WHOची टीम कोरोनाबद्दल चीनी वैज्ञानिकांशी चर्चा करणार असल्यांचही म्हटलं जात आहे.
वुहानमधील सत्य पडताळणी -
1फेब्रुवारी 2020 मध्ये झांग हई यांच्या वडिलांचा वुहान दौऱ्यानंतर मृत्यू झाला होता. हुई यांनी म्हटलं, की मला आशा आहे, की WHO ची टीम खोटी माहिती पसरवणाऱ्या गटाचा हिस्सा होणार नाहीत. ते म्हणाले, आम्ही सत्याच्या शोधात आहोत. हा एक गुन्हा आहे आणि WHO नं चीनमध्ये येऊन अशा गुन्ह्यांवर पडदा टाकू नये, अशी आम्हाला आशा आहे. चीनच्या विदेश मंत्रालयानं या मागणीवर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वुहानमध्ये दाखल WHOची टीम -
WHOची टीम 14जानेवारीला वुहानमध्ये गेली. 14 दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर ही टीम कोरोना नेमका कसा पसरला याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
पीडितांवर सरकारकडून दबाव -
हई यांनी सांगितलं, की चीन सरकार पीडितांना काहीही बोलण्यापासून थांबवत आहे. तसंच विदेशी मीडियासोबत बोलणाऱ्या लोकांनाही धमकी दिली जात आहे.