मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /पुन्हा येणार संकट? आला कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हेरियंट; WHO नंही दिला दुजोरा

पुन्हा येणार संकट? आला कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हेरियंट; WHO नंही दिला दुजोरा

डेल्टा (Delta) आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हॅरिएंट्सच्या एकत्रित म्युटेशनमधून तयार झालेला नवा विषाणू (Virus) आढळून आल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

डेल्टा (Delta) आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हॅरिएंट्सच्या एकत्रित म्युटेशनमधून तयार झालेला नवा विषाणू (Virus) आढळून आल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

डेल्टा (Delta) आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हॅरिएंट्सच्या एकत्रित म्युटेशनमधून तयार झालेला नवा विषाणू (Virus) आढळून आल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

  नवी दिल्ली, 12 मार्च:  जगातले बहुतांश देश गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा (Corona latest news) सामना करत आहेत. दरम्यानच्या काळात कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि ओमिक्रॉन असे व्हॅरिएंट्स (new Variant of corona) आढळून आले आहेत. भारताचा विचार करता नुकतीच कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. परंतु, कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. भारतासह अनेक देशांमध्ये वेगानं पसरणाऱ्या ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्णही आढळून येत आहेत. भारतात तिसरी लाट ओसरल्याने आणि कोरोनाबाधित रुग्णांची दैनंदिन संख्या घटल्याने निर्बंध हटवण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मात्र आता एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. डेल्टा (Delta) आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हॅरिएंट्सच्या एकत्रित म्युटेशनमधून तयार झालेला नवा विषाणू (Virus) आढळून आल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. याला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दुजोरा दिला आहे. याविषयीचं वृत्त `न्यूज इंडिया लाइव्ह`ने दिलं आहे.

  `कोरोनाच्या ओमिक्रॉन आणि डेल्टा या व्हॅरिएंट्सचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्यानं नवा विषाणू आढळणार हे आम्हाला अपेक्षित होतं. आता या नव्या विषाणूची तीव्रता आणि संसर्गाची क्षमता समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू आहे,` असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सायप्रसमधल्या (Cyprus) प्रयोगशाळेत आढळलेले `डेल्टाक्रॉन संकरित कोविड-19` म्युटेशन हा बहुधा त्या प्रयोगशाळेतल्या त्रुटींचा परिणाम होता, असं तज्ज्ञांनी सांगितलं होतं. सायप्रसमधल्या माध्यमांनी या विषाणूला ओमिक्रॉनच्या काही म्युटेशनसोबत `डेल्टा व्हॅरिएंटचं आनुवंशिक मूळ` असं म्हटलं होतं.

  Explainer: भारताने चुकून डागलं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र; नेमकी काय आणि कसं घडलं?

  ... मात्र आता पाश्चर इन्स्टिट्यूट या फ्रेंच संस्थेच्या (Pasteur Institute) अलीकडच्या अभ्यासातून डेल्टा आणि ओमिक्रॉन रिकॉम्बिनेशन व्हायरसचे (ReCombination Virus) ठोस पुरावे मिळाले आहेत. या डेटा आणि विश्लेषणातून हा रिकॉम्बिनंट व्हायरस Gk/AY.4 (Delta) + GRA/BA.1 (Omicron) यामधून तयार झाल्याचं स्पष्ट होतं. फ्रान्समधल्या (France) काही भागात हा रिकॉम्बिनंट व्हायरस आढळून आला आणि जानेवारी 2022 च्या सुरुवातीपासून त्याचा प्रसार होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजेच डेन्मार्क (Denmark) आणि नेदरलँड्समध्येदेखील या विषाणूशी साधर्म्य दर्शवणारे जीनोम (Genome) आढळून आले होते. हा रिकॉम्बिनंट व्हायरस जुन्या कुठल्या विषाणूंमधून तयार झाला आहे का हे निर्धारित करण्यासाठी अतिरिक्त तपासणी आणि विश्लेषण आवश्यक आहे.

  `डब्ल्यूएचओ`च्या मारिया वान-केरखोव यांनी ट्विटरवर म्हटलं आहे, ``ओमिक्रॉन आणि डेल्टाचा वेगानं प्रसार होत असल्यानं हे अपेक्षित होतं. आता डब्ल्यूएचओ याबाबत ट्रॅकिंग आणि चर्चा करत आहे.`

  `डब्ल्यूएचओ`च्या एका अधिकाऱ्यानं पत्रकार परिषदेत सांगितलं, `सध्या या नव्या विषाणूची तीव्रता आणि प्रसार क्षमतेत कोणताही बदल झालेला दिसून येत नाही; मात्र याचा अभ्यास सुरू आहे. या टप्प्यावर चाचणी महत्त्वपूर्ण असेल. फ्रान्सच्या काही भागांमध्ये रीकॉम्बीनंट विषाणूची ओळख पटली आहे आणि जानेवारी 2022 च्या सुरुवातीपासून त्याचा प्रसार होत आहे.`

  भारतात कोरोनामुळे झालेले मृत्यू सरकारी आकडेवारीपेक्षा 8 पट जास्त? अहवालात दावा

  विशेष म्हणजे, डेन्मार्क आणि नेदरलॅंड्समध्ये देखील अशाप्रकारचे समान जीनोम आढळले आहेत. जर हा विषाणू त्याच्या पूर्वीच्या व्हर्जनमधून उत्पन्न झाला असेल तर त्यासाठी तपासणी आणि विश्लेषणाची गरज आहे. पूर्वी जेव्हा नागरिकांमध्ये हा रीकॉम्बिनंट व्हायरस डेल्टाक्रॉन म्हणून ओळखला जात होता. तेव्हा `डब्ल्यूएचओ`च्या अधिकाऱ्यानेही` डेल्टाक्रॉन (Deltacron) याचा अर्थ डेल्टा आणि ओमिक्रॉन हे एकत्र असल्याचं सांगितलं होतं.

  First published:
  top videos

   Tags: Corona, Corona spread, Corona updates, Wave