मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा Vaccine दान करा; WHO नं का दिला असा सल्ला?

लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा Vaccine दान करा; WHO नं का दिला असा सल्ला?

व्हॅक्सीन म्हणजे काय ?  जाणून घ्या कसं काम करतं ?

व्हॅक्सीन म्हणजे काय ? जाणून घ्या कसं काम करतं ?

आरोग्य संघटनेनं असा सल्ला दिला, की त्यांनी कोव्हॅक्स योजनेंतर्गत गरीब देशांना कोरोना लशी (Corona Vaccine) दान करायला पाहिजेत. WHO चे प्रमुख अधानोम गेब्रियेसुस यांनी भारताबाबत (Coronavirus in India) चिंता व्यक्त केली.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 15 मे : जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) म्हणजेच WHO नं शुक्रवारी श्रीमंत देशांना असं आवाहन केलं आहे, की त्यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत (Vaccination of Children's) पुन्हा एकदा विचार करावा. आरोग्य संघटनेनं या देशांना असा सल्ला दिला, की त्यांनी कोव्हॅक्स योजनेंतर्गत गरीब देशांना कोरोना लशी (Corona Vaccine) दान करायला पाहिजेत. WHO चे प्रमुख अधानोम गेब्रियेसुस यांनी भारताबाबत (Coronavirus in India) चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की महानमारीचं दुसरं वर्ष हे पहिल्या वर्षीच्या तुलनेत अधिक जीवघेणं ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गावांमध्ये कोरोना झपाट्यानं पसरत असल्याचं सांगत लोकांनी सावध केलं. याच पार्श्वभूमीवर त्यांनी लोकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनापासून बचावासाठीच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं. देशात कोरोनाची 2 कोटी 4 लाखाहूनही अधिक प्रकरणं समोर आली आहेत. तर, सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनानं चार हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत तब्बल 2.6 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.

कोरोना महामारीला एक अदृश्य शत्रू घोषित करत पंतप्रधान म्हणाले, की सरकार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी युद्धस्तरावर काम करत आहे. त्यांनी असा विश्वास व्यक्त केला, की या लढ्यात देश नक्कीच विजय मिळवेल. यावेळी लसीकरण हा कोरोनापासून बचावासाठी महत्त्वाचा उपाय असल्याचं मोदी म्हणाले. देशभरात लसींचे 18 कोटीहून अधिक डोस लोकांना दिले गेले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजन आणि औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचं आवाहन राज्यांना केलं. शुक्रवारी देशात कोरोनाचे 3 लाख 42 हजार 896 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, 3,997 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 37 लाख 327 इतकी आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine in market, Sanjeevani