मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Vaccination झालेल्यांनी कधी घ्यायचा बुस्टर डोस? भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती

Vaccination झालेल्यांनी कधी घ्यायचा बुस्टर डोस? भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती

कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस पूर्ण (When to take third booster dose guides Bharat Biotech MD) झालेल्यांनी बुस्टर डोस कधी घ्यायचा, याची माहिती ‘भारत बायोटेक’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी जाहीर केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस पूर्ण (When to take third booster dose guides Bharat Biotech MD) झालेल्यांनी बुस्टर डोस कधी घ्यायचा, याची माहिती ‘भारत बायोटेक’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी जाहीर केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस पूर्ण (When to take third booster dose guides Bharat Biotech MD) झालेल्यांनी बुस्टर डोस कधी घ्यायचा, याची माहिती ‘भारत बायोटेक’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस पूर्ण (When to take third booster dose guides Bharat Biotech MD) झालेल्यांनी बुस्टर डोस कधी घ्यायचा, याची माहिती ‘भारत बायोटेक’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी जाहीर केली आहे. कोव्हॅक्सिची दुसरी लस घेतल्यानंतर (Booster dose to be taken after six months of vaccination) सहा महिन्यांनी हा बुस्टर डोस घेणं गरजेचं असल्याची माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी दिली आहे. हा बुस्टर डोस नेजल डोस असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यांना आता तिसरा (Third dose of corona vaccine) डोस घेणं गरजेचं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

Nasal Dose चं महत्त्व

भारत बायोटेककडून कोरोना प्रतिबंधक लसीचा नेजल डोस म्हणजेच नाकावाटे घेण्याचा डोस तयार झाल्याची माहिती त्यांनी दिली. इंजेक्शनमार्फत घेतल्या जाणाऱ्या डोसच्या तुलनेत हा डोस अत्यंत प्रभावी असून कोरोना विषाणूवर तो जास्त परिणामकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

इम्यूनोलॉजी आणि प्रयोग

जगभरात सध्या इम्यूनोलॉजीवर प्रयोग आणि संशोधन सुरू असून नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीची परिणामकारकता अधिक असल्याचं दिसून येत आहे. मात्र भारत बायोटेककडून सर्वात अगोदर हा नेजल डोस तयार करण्यात आले असून त्याची पहिल्या टप्प्याची चाचणीदेखील यशस्वी पार पडल्याचं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधानांनी घेतली लस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोव्हॅक्सिन लस घेऊन आमच्यावर दाखवलेला विश्वास हा अतुलनीय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. टाईम्स नाऊ संमेलन, 2021 या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्राच्या प्रमुख व्यक्तींनं तुमच्या संशोधनावर विश्वास दाखवणं ही बाब फारच मोठी असल्याचं ते म्हणाले.

हे वाचा-  मुलांसाठी लस अजूनही नाहीच, DGCI च्या मंजुरीसाठी होतोय उशीर

झिका व्हॅक्सिन लवकरच

भारत बायोटेक कंपनीकडून झिका व्हायरसवरील लसदेखील तयार करण्यात आली असून त्याच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचंही ते म्हणाले. कोरोनावरील नेजल व्हॅक्सिन आणि झिकावरील व्हॅक्सिन ही दोन महत्त्वाकांक्षी उत्पादनं लवकरच बाजारात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Vaccine