नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : कोरोना प्रतिबंधक लसीचे (
Anti covid vaccine) दोन डोस (
Two Doses) घेऊनही अनेकांना कोरोनाची लागण (
Infection) होत असल्यामुळे आता तिसरा डोस (
Third Dose) घेण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेक देशांमध्ये दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता तिसरा बुस्टर डोस द्यायलाही सुरुवात झाली आहे. मात्र भारतातील लोकसंख्या आणि लसी उपलब्ध होण्याचा वेग यांचा विचार करता ही गोष्ट शक्य होईल का, याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय नागरिकांना तिसरा डोस म्हणजेच बुस्टर डोस देता येईल का, याबाबत प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष के. श्रीकांत रेड्डी यांनी उत्तर दिलं आहे. जगातील प्रगत देशांनी 2021 च्या सुरुवातीपासूनच वेगवान लसीकरणाला सुरुवात केली. इस्रायलसारख्या देशात तर 100 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तिसऱा डोस दिला जात आहे. मात्र रेड्डी यांच्या मते तिसऱ्या डोसला बुस्टर डोस म्हणणं चुकीचं आहे.
कोरोनाच्या पहिल्या डोसला प्राथमिक डोस म्हटलं जातं, तर दुसऱ्या डोसलाच बुस्टर डोस म्हटलं जातं. त्यामुळे तिसऱ्या डोसलाही बुस्टर डोस म्हणणं चुकीचं असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. मात्र त्याच्या नावावरून मतभेद असले, तरी तिसरा डोस देण्याची गरज गेल्या काही दिवसांतील अनुभवावरून अधोरेखित होत असल्याचं रेड्डी यांचं म्हणणं आहे. मात्र तिसऱ्या डोसमुळे दीर्घकालीन फायदा होतो का, दुसऱ्या डोसच्या तुलनेत किती प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, याबाबत मात्र कुठलेही तपशील उपलब्ध नसल्याचं रेड्डी यांचं म्हणणं आहे.
टाईम्स ऑफ इंडियात प्रकाशित झालेल्या लेखात रेड्डी यांनी इस्रायलचं उदाहरण दिलं आहे. इस्रायलमध्ये नोंदवल्या गेलेल्या निरीक्षणानुसार दोन डोस घेतलेल्यांच्या तुलनेत तीन डोस घेतलेल्यांमध्ये क्लिनिकल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण 11 पट कमी नोंदवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे, तर तीन डोस घेतलेल्या नागरिकांना गंभीर स्वरुपाचं इन्फेक्शन होण्याचं प्रमाण 15 टक्के कमी नोंदवण्यात आलं आहे.
हे वाचा -
मुंबई दौऱ्यात ब्रिटीश उच्चायुक्तालाही वडापावने घातली भुरळ, गणपतीचंही घेतलं दर्शन
जागतिक आरोग्य संघटनेनं तिसऱ्या डोसला सध्या तरी ग्रीन सिग्नल दिलेला नाही. मात्र रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या नागरिकांना तो देणं गरजेचं आहे, असंदेखील म्हटलं आहे. भारतात अद्याप तिसऱ्या डोसविषयी कुठलाही निर्णय झालेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.