• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • वाढतोय कोरोनाचा धोका! पुढील अनेक वर्षे वापरावा लागणार मास्क, तज्ज्ञांचा इशारा

वाढतोय कोरोनाचा धोका! पुढील अनेक वर्षे वापरावा लागणार मास्क, तज्ज्ञांचा इशारा

पुढील कित्येक वर्षे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करत राहावा लागेल, असा इशारा जागतिक स्तरावरील तज्ज्ञांनी दिला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे जागतिक आरोग्य क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

 • Share this:
  लंडन, 21 मार्च: सध्या जगभरात कोरोना विषाणूचा (Corona virus) धोका वाढतचं चालला आहे. जगातील कोट्यावधी लोकांना आतापर्यंत कोरोनानं ग्रासलं (Infect Corona Virus) आहे. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता अनेक देशांना सतावत आहे. जगभरातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccination) दिली जात असली तरी कोरोनाचा धोका कमी झालेला नाहीये. त्यामुळे आपल्याला मास्क आणि सामाजिक अंतराच्या (Social Distancing) नियमांचं पालन करावं लागणार आहे. अशातचं इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. रॅमसे यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या मतानुसार, पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांपर्यंत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करत राहावा लागेल. त्यांच्या या दाव्यामुळे जागतिक आरोग्य क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. डॉ. रॅमसे म्हणाले की, जगभरातील लोकांना आता कमी जास्त प्रमाणात निर्बंधांची सवय झाली आहे. आता अशा सौम्य निर्बंधांसोबत माणूस जगू शकतो. त्याचबरोबर या निर्बंधांच्या परिस्थितीतही अर्थव्यवस्था पुढे जाऊ शकते. त्यामुळे कोणतेही नियम किंवा निर्बंध शिथिल करण्यापूर्वी सरकारला सखोल विचार करावा लागेल. (हे वाचा-24 तासांत गंभीर कोरोना रुग्ण 92वरून 4,219 वर; आणखी एक नवा स्ट्रेन आढळल्याने खळबळ) डॉ. रॅमसे पुढे म्हणाले की, 'मोठ्या प्रमाणात लोकं उपस्थित राहतील अशा कार्यक्रमांबाबत अधिक काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर कोरोना नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांच पालनही कठोरपणे करणं आवश्यक आहे. आपण जर भारताबद्दल विचार करायचा झाला तर, देशातील बर्‍याच राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संबंधित सरकारे अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलतं आहेत. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणं कठीण बनत चाललं आहे. अशातचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना पाळण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, लोकांनी कोरोना नियमांच्याबाबतीत निष्काळजीपणा करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वाचं काटेकोर पालन करायला हवं. त्याच बरोबर सोशल डिस्टन्सिंग  आणि फेस मास्कचा वापराकडे दुर्लक्ष करू नये.
  Published by:News18 Desk
  First published: