• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • 101 वर्षांच्या आजीचे कोरोनाला धोबीपछाड; अवघ्या 10 दिवसात बरी होऊन परतली घरी

101 वर्षांच्या आजीचे कोरोनाला धोबीपछाड; अवघ्या 10 दिवसात बरी होऊन परतली घरी

वाशिम जिल्ह्यातील अनेकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसतांना दिसत आहे.  यामध्ये तरुण वयाच्या अनेकांना आपले प्राण गमवावे लागल

  • Share this:
वाशिम, 22 मे : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर जरी पडत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही फार मोठी आहे. कित्येक ज्येष्ठ नागरिक, एचआर सीटी स्कोर अधिक असलेले रुग्णही आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत असल्यानेच ते कोरोनावर मात करून घरी परतत आहेत. अशाच जयवंताबाई रंजवे या 101 वर्षांच्या वृद्ध आजीने कोरोनाला धोबी पछाड देत त्यावर मात केली आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील जयवंताबाई गंगाराम रंजवे या 101 वर्षांच्या आजीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आजीला कवठा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं होतं. तिथे कार्यरत डॉक्टर आणि परिचारिकांनी आजीवर कोरोनाचे उपचार सुरू केले. आजीने ही उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत 10 दिवसातच कोरोनाला हरवून मात केल्याचं त्यांचा नातू ओमप्रकाश रंजवे सांगत आहे. हे ही वाचा-पोटात दुखल्यास दुर्लक्ष करु नका, दिल्लीत छोट्या आतड्यांमध्ये आढळला ब्लॅक फंगस जयवंताबाई रंजवे  यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. तसेच कानाने ऐकूही सुद्धा येत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांचा स्कोर 12 होता तर ऑक्सिजनची पातळी 87 एवढी खाली आली होती. मात्र कोरोना सारख्या महामारीला झुंज देत त्यांनी कोरोनाला हरविले. आईच्या सोबतीला डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि कुटुंबाच्या मानसिक पाठबळावर तिने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. विशेष म्हणजे त्यांचा औषधोपचार सेनगाव तालुक्यातील कवठा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातच झाल्याचं त्यांचा मुलगा सोपानराव रंजवे यांनी सांगितलं. वाशिम जिल्ह्यातील भोकरखेड येथील जयवंताबाई रंजवे या 101 वर्षांच्या आजीला 4 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आजीवर कोविडचे उपचार सुरू केले. आजीनेही आत्मविश्वासाच्या बळावर कोरोनाच्या उपचारांना साथ देत त्याला हरविल्याचं कालवठा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.जगन्नाथ काकडे यांनी सांगितलंय. कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजताच अनेक जणं घाबरुन जातात. मात्र जयवंताबाई रंजवे या 101 वर्षांच्या आजीला कोरोना काय असतो, हे माहीतच नसल्यानं संसर्ग होऊन ही कोणतीही भिती न बाळगल्यानेच त्या कोरोनावर यशस्वी मात करू शकल्या. जर तुमची जिद्द आणि इच्छा शक्ती प्रबळ असेल तर कोरोना सारखा आजार ही बरा होऊ शकतो. ते या 101 वर्षांच्या आजीकडून इतर रुग्णांनी शिकणे आवश्यक आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: