मुंबई, 29 मे: मुंबई महापालिकेनं (Brihanmumbai Municipal Corporation ) स्तनपान देणाऱ्या महिलानंतर परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन लसीकरणाची योजना आखली आहे. परदेशातील विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Maharashtra minister Aaditya Thackeray) यांनी सांगितलं. सध्या परदेशात जात असताना लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं हा निर्णय घेतला आहे.
For students who have received confirmation of admission in universities abroad & require vaccines for the same, the @mybmc has arranged free, walk in vaccination this coming Monday, Tuesday, Wednesday (31st May, 1st, 2nd June) at 3 centres- Rajawadi, Cooper & Kasturba (1/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 28, 2021
मुंबईतल्या तीन केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असेल. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा आहे. म्हणजेच 31 मे, 1 जून, 2 जून असे दिवस परदेशी जाणारे विद्यार्थी वॉक इन (walk-in vaccination) लस घेऊ शकणार आहेत. राजावाडी, कुपर आणि कस्तुरबा या तीन लसीकरण केंद्रांवर विद्यार्थ्यांना लस घेता येणार आहे.
The students need to carry I- 20 or DS- 160 form/ verified confirmation letter to concerned foreign universities, along with personal id documents. This admission and vaccine affecting careers, we are duty bound to vaccinate them in the required time.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 28, 2021 आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट देखील केलं आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ‘लसीकरणाच्या वेळी विद्यार्थ्यांसोबत I-20 किंवा DS- 160 form/ संबंधित परदेशी विद्यापीठाकडून आलेलं confirmation letter त्यासह वैयक्तिक कागदपत्र असणं आवश्यक असल्याचं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं. I will also be speaking to other municipal corporations across Maharashtra to implement the same for students in and around those cities with confirmation letters for universities abroad, to implement the same. The numbers are small, but their career opportunities can’t be missed — Aaditya Thackeray (@AUThackeray) May 28, 2021 तसंच परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये अशी योजना आखावी यासाठी पालिकांशी बोलणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.