VIDEO : मास्क लावला नाही म्हणून आत्मानंद सरस्वतींना दंड; मोदींचं नाव घेऊन करत राहिले समर्थन

VIDEO : मास्क लावला नाही म्हणून आत्मानंद सरस्वतींना दंड; मोदींचं नाव घेऊन करत राहिले समर्थन

मास्क लावला नसल्याने अयोध्या राम जन्मभूमी निर्माण न्यासाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्वामी आत्मानंद सरस्वती यांचं मध्य प्रदेशातील दमोहमध्ये चलान कापण्यात आलं. त्यांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

दमोह, 29 एप्रिल : मास्क लावला नसल्याने अयोध्या राम जन्मभूमी निर्माण न्यासाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्वामी आत्मानंद सरस्वती यांचं मध्य प्रदेशातील दमोहमध्ये चलान कापण्यात आलं. ही घटना बुधवारी सायंकाळी पथरिया तहसील मुख्यालयातील आहे. याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. आत्मानंद यावेळी अधिकाऱ्यांना विचित्र तर्क देऊ लागहले. दमोह पोलिसांनी जेव्हा त्यांना मास्क लावण्याचा आग्रह केला, तेव्हा ते म्हणाले की हवं तर संपूर्ण मीडियाला बोलवा, मी मास्क नाही लावणार. आणि मी चलानही देणार नाही. मला अटक करा.

संपूर्ण देशात कोरोना संसर्गामुळे हाहाकार झाला आहे. मध्य प्रदेशातही कोरोनाची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. ज्याच्या नियंत्रणासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. दमोह जिल्ह्याच्या पथरिया तहसील मुख्यालयात बुधवारी सांयकाळी उशीर कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या कारवाईदरम्यान जेव्हा प्रशासनाने कनिष्ठ शंकराचार्य आत्मनंद राष्ट्रीय उपाध्यक्ष रामजन्म भूमी निर्माण न्यास अयोध्याची कार थांबवली आणि मास्क लावण्याबद्दल सांगितलं तर ते चिडले. ते म्हणाले की, माझ्याकडून चलान घेतलं जाणार नाही आणि मी मास्कही लावणार नाही. हवं तर मला अटक करा.

हे ही वाचा-VIDEO : 20 किमीचं अंतर 20 मिनिटांत केलं पूर्ण;पोलिसांनी 38 रुग्णांचे वाचले प्राण

जेव्हा कारवाईच्या दरम्यान तहसीलदार विकास जैन आणि पथरिया ठाण्याच्या प्रभारींनी वारंवार कनिष्ठ शंकराचार्य आत्मानंद सरस्वती यांनी मास्क लावण्यास सांगितलं तर, संत म्हणाले की, त्यांनी मास्क लावल्यामुळे श्वास गुदमरल्यासारखा होता आणि त्यांच्यासोबत जो ड्रायव्हर आहे, त्याने कोरोना नियमावलीचं पालन करीत मास्क लावला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 29, 2021, 11:10 PM IST

ताज्या बातम्या