केवळ 21 दिवसाच्या अंतरानं दिले जाणार Sputnik V चे 2 डोस, जाणून घ्या किती प्रभावी आहे लस

केवळ 21 दिवसाच्या अंतरानं दिले जाणार Sputnik V चे 2 डोस, जाणून घ्या किती प्रभावी आहे लस

आधीच्या दोन्ही लसींप्रमाणेच (Corona Vaccine) नव्या लसीचा वापरही 18 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या लोकांसाठी करता येणार आहे. Sputnik V या लसीचा दुसरा डोस 21 दिवसांच्या अंतरानं दिला जातो.

  • Share this:

नवी दिल्ली 13 एप्रिल : भारतात 16 जानेवारीला देशव्यापी लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. यानंतर आता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) Sputnik V या लसीच्या आपात्कालीन वापरासही मंजुरी दिली आहे. यानंतर आता आनंदाची बातमी म्हणजे भारताला तिसरी लस मिळाली (India gets 3rd COVID-19 vaccine) आहे. याआधी भारतात सिरम इनस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (SII) कोविशिल्ड आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडद्वारा निर्मित कोव्हॅक्सिनच्या (Covaxin) वापराला भारतात परवानगी मिळाली होती.

Sputnik V ही लस उणे 18 अंश सेल्सिअस तापमानात स्टोर केली जाते. ती 2-8 अंश सेल्सिअस तापमानातही साठवता येऊ शकते. यासाठी कोल्ड-चेन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. आरडीआयएफच्या मते, Sputnik V 55 देशांमधील 150 कोटींपेक्षा जास्त लोकांना वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या लसीची किंमत प्रति डोस 10 डॉलरपेक्षा कमी ठेवण्याचा प्रस्ताव आहे. त्याची किंमत भारतात किती असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

हेही वाचा -  भारताला मिळाली तिसरी कोरोना लस, Sputnik V च्या आपात्कालीन वापरास परवानगी

आधीच्या दोन्ही लसींप्रमाणेच याचा वापरही 18 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या लोकांसाठी करता येणार आहे. मात्र, भारतात सध्या 45 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांनाच लस दिली जात आहे. Sputnik V या लसीचा दुसरा डोस 21 दिवसांच्या अंतरानं दिला जातो. भारतात सध्या 28 दिवसांच्या अंतरानं दुसरी लस दिली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Sputnik V ही लस वापराआधी उणे 18 अंश सेल्सिअसवर स्टोर करावी लागणार आहे. सुरुवातीला ही लस रेड्डी लॅबकडून रशियाहून आयात केली जाणार आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 13, 2021, 1:51 PM IST

ताज्या बातम्या