मुंबई, 21 ऑगस्ट : 20 दिवसांत जवळपास देशात 62 ते 69 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत होती मात्र एका दिवसांत आज दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 24 तासांत 62 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यानं दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात 68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासांत 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्थांची संख्या 29 लाखावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 54 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Total number of samples tested up to 20th August is 3,34,67,237 including 8,05,985 samples tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR)#COVID19 pic.twitter.com/8KRIcp0ndF
— ANI (@ANI) August 21, 2020
महाराष्ट्रात Coronavirus च्या रुग्णांमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा उच्चांकी वाढ झाली आहे. 14 हजारांवर नवे रुग्ण 24 तासांत दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या Covid-19 च्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,62,491 एवढी झाली आहे. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा एसटी सेवा सुरू होत असतानाच ही विक्रमी रुग्णवाढ झाल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.