मनीला, 08 जानेवारी : कोरोनाची
(Coronavirus) प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. ओमिक्रॉनमुळे
(Omicron) संसर्गाचा वेगही वाढला आहे. अशात कोरोना लसीकरणावर
(Corona vaccination) भर दिला जातो आहे. पण काही लोक अद्यापही कोरोना लस
(Corona vaccine) घेत नाही आहेत. त्यामुळे आता सरकारही कठोर पावलं उचलताना दिसत आहे. जे लोक कोरोना लस घेणार नाही, ते घराबाहेर पडताच त्यांना अटक करा, असे आदेश देण्यात आले आहेत.
फिलीपाइन्समध्ये
(Philippines) कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आणि जास्तीत जास्त लसीकरण व्हावं यासाठी असा कठोर नियम जारी करण्यात आला आहे. कोरोना लस न घेणाऱ्या आदेशाचे उल्लंघन करत घराबाहेर पडत असतील तर त्यांना तात्काळ अटक केलं जाईल. राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुतर्ते
(Rodrigo Duterte) यांनी असा कठोर निर्णय घेतला आहे.
फिलीपाइन्समध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोना वेगाने पसरतो आहे. इंडिपेन्डेन्टच्या रिपोर्टनुसार देशाची राजधानी मनीला आणि आजूबाजूच्या परिसरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. फिजिकल क्लास आणि स्पोर्ट्ससंबंधी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. पार्क, चर्च आणि रेस्टॉरंट कमी क्षमतेसह सुरू आहेत.
हे वाचा - लस घेताना घ्या काळजी; 15-18 वयोगटातल्या मुलांसाठी केवळ या लशीला मिळालीये परवानगी
देशातील एकूण 11 कोटी लोकसंख्येपैकी 45 टक्के लोकांचं पूर्ण लसीकरण झालेलं आहे. लस न घेतलेल्या लोकांची संख्या पाहून राष्ट्राध्यक्ष दुतर्तेनाही धक्का बसला आहे. त्यामुळए ज्या लोकांनी कोरोना लस घेतली नाही, त्यांना आपल्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुतर्ते यांनी सांगितलं की ही एक राष्ट्रीय आपात्कालीन परिस्थिती आहे. प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी मी जबाबदार आहे. त्यामुळे ज्या लोकांनी लस घेतली नाही आहे, त्यांच्यावर लगाम लावण्याचा निर्णय आम्ही घेतला. ज्यांनी कोरोना लस घेतली नाही. अशा लोकांना शोधलं जाईल आणि त्यांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जर लोकांनी असं करण्यास नकार दिला आणि घराबाहेर पडले तर त्यांना लगेच अटक केली जाईल.
हे वाचा - लस घेताना घ्या काळजी; 15-18 वयोगटातल्या मुलांसाठी केवळ या लशीला मिळालीये परवानगी
गेल्या वर्षी जूनमध्ये डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातलं तेव्हाही दुतर्ते यांनी लस घेण्यास नकार देणाऱ्यांना जेलमध्ये बंद करण्याची धमकी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.