Home /News /coronavirus-latest-news /

सावधान! तुमच्या मुलांना चुकीची लस दिली जात नाहीये ना? 15-18 वयोगटातल्या मुलांसाठी केवळ या लशीला मिळालीये परवानगी

सावधान! तुमच्या मुलांना चुकीची लस दिली जात नाहीये ना? 15-18 वयोगटातल्या मुलांसाठी केवळ या लशीला मिळालीये परवानगी

काही लसीकरण केंद्रावर 15 ते 18 वयोगट या नवीन पात्र गटाला मंजूर नसलेली ( unapproved vaccines) लस दिली जात असल्याचं समोर आलं आहे

नवी दिल्ली 08 जानेवारी : भारतात 3 जानेवारी 2022पासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीकरण सुरू झालं आहे. मुलांना भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) लस ( vaccination) देण्यात येत आहे. भारत बायोटेकने आरोग्य कर्मचार्‍यांना ( health workers) या लसीकरणाबद्दल सावध राहण्याची विनंती केली आहे. कंपनीचं म्हणणं आहे, की 'काही लसीकरण केंद्रावर 15 ते 18 वयोगट या नवीन पात्र गटाला मंजूर नसलेली (unapproved vaccines) लस दिली जात असल्याचं समोर आलं आहे.' 15-18 या वयोगटासाठी फक्त कोव्हॅक्सिन लशीला परवानगी देण्यात आली आहे. भारतात 16 जानेवारी 2021 पासून सर्वांची लसीकरण मोहीम सुरू झाली. तर 3 जानेवारी 2022पासून 15 ते 18 वर्षं वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालं. लहान मुलांवर का अधिक होतोय ओमायक्रॉन व्हेरिएंटचा परिणाम? तज्ज्ञांनी दिलं उत्तर भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीने ट्विट करून आरोग्य कर्मचाऱ्यांना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने ट्विट केलं, की '15-18 वयोगटातल्या मुलांना कोव्हॅक्सिनव्यतिरिक्त अन्य लस दिल्याबाबत अनेक रिपोर्ट्स आम्हाला प्राप्त झाले होते. आम्ही आरोग्य कर्मचार्‍यांना विनंती करतो, की 15-18 वयोगटातल्या मुलांना केवळ कोव्हॅक्सिन लस दिली जाईल, यासाठी त्यांनी काळजी घ्यावी.' कंपनीने आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभारदेखील मानले आहेत. कोव्हॅक्सिन लशीचा डोस दिल्यानंतर मुलांना पेनकिलर टॅब्लेट देऊ नका असा सल्ला एका दिवसापूर्वीच भारत बायोटेक कंपनीने दिला होता. कंपनीने स्पष्ट केलं होतं, की 'काही लसीकरण केंद्रावर मुलांना लस दिल्यानंतर 3 पॅरासिटामॉल टॅब्लेट दिल्या जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. परंतु कोव्हॅक्सिन लस दिल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा पेनकिलर टॅब्लेट देऊ नये.' Omicron in India : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी होम क्वारंटाइनचे दिवस ठरले दरम्यान, 7 जानेवारी 2022 रोजी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत देशाने 150 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी देशवासीयांचं अभिनंदन केलं. पंतप्रधानांनी ट्विट केलं, की 'लसीकरणाच्या मोहिमेतला आजचा दिवस उल्लेखनीय होता. 150 कोटींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन. या लसीकरण मोहिमेमुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. आपल्याला कोविड-19 शी संबंधित सर्व प्रोटोकॉल्सचं पालन करत राहावं लागणार आहे.' देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढू लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सरकारने सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातसुद्धा विविध निर्बंध लावण्यात येत आहेत. जास्तीत जास्त व्यक्तींचं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व्हावं, यासाठीही नियोजन केलं जात आहे.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine

पुढील बातम्या