Home /News /coronavirus-latest-news /

भारतातील Vaccine च्या प्रभावाबाबत अमेरिकेला शंका? Covaxin घेतलेल्या विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार दुसरी लस

भारतातील Vaccine च्या प्रभावाबाबत अमेरिकेला शंका? Covaxin घेतलेल्या विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार दुसरी लस

भारतात तयार झालेली कोव्हॅक्सिन (Covaxin vaccine) प्रभावी असल्याचं अमेरिकेला (America) मान्य नाही का? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे, कारण अमेरिकेनं कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेल्या व्यक्तींना पुन्हा एकदा दुसऱ्या व्हॅक्सिनचा डोस घेण्यास सांगितलं आहे

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 06 जून : भारतात तयार झालेली कोव्हॅक्सिन (Covaxin vaccine) प्रभावी असल्याचं अमेरिकेला (America) मान्य नाही का? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे, कारण अमेरिकेनं कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेल्या व्यक्तींना पुन्हा एकदा दुसऱ्या व्हॅक्सिनचा डोस घेण्यास सांगितलं आहे. अमेरिकेत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक व्ही या लसींचा डोस घेणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दोन्ही लशी क्रमशः भारतात आणि रशियामध्ये विकसित केल्या गेल्या आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटेनं अद्याप या लशींच्या वापराला परवानगी दिलेली नाही. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत मार्चपासून आतापर्यंत अनेक कॉलेज आणि विद्यापीठांनी घोषणा केली आहे, की विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण करणं अनिवार्य असेल आणि तेदेखील जागतिक आरोग्य संघटनेनं परवानगी दिलेल्या लसींचंच. हा आदेश अमेरिकी संस्थांमध्ये दाखल होण्यासाठी जात असलेल्या अशा भारतीय आणि ऱशियाच्या अशा विद्यार्थ्यांसाठी चिंतेचा विषय़ ठरला आहे, ज्यांनी कोव्हॅक्सिन किंवा स्पुतनिक व्ही ही लस घेतली आहे. औषध म्हणून Steroid घेत आहात? या चुका टाळा; अचानक वाढेल वजन 25 वर्षीय भारतीय विद्यार्थीनी मिलोनी दोशीही यातीलच एक आहे. मिलोनीनं कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंटरनॅशनल अॅण्ड पब्लिक अफेअर्समध्ये अॅडमिशन घेतलं आहे. तिनं भारतात कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, आता विद्यापीठ प्रशासनानं असं स्पष्ट केलं आहे, की कोलंबिया युनिव्हर्सिटी परिसरात पोहोचून तिला दुसरी लस घ्यावी लागेल. इतर अमेरिकी संस्थानांनीही अशीच सुचना केली आहे. त्यामुळे, दोन वेगवेगळ्या लसीच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थी चिंतेत आहेत. कोरोनामुळे आई-बाबांच छत्र हरवलं, यशोमती ठाकूर यांनी घरी जाऊन मुलाची घेतली भेट भारत बायोटेकनं असं म्हटलं आहे, की कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून जुलै-सप्टेंबरपर्यंत आपात्कालीन वापरास परवानगी मिळेल, अशी आशा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे, की आपात्कालीन वापराच्या सूचीमध्ये कोव्हॅक्सिनला सामील करण्यासाठी भारत बायोटेककडून आणखी अधिक माहिती प्राप्त होण्याची गरज आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: American indians, Corona vaccine

    पुढील बातम्या