मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /मोठा दिलासा! Omicron वर औषध सापडलं; GSK-Vir च्या शास्त्रज्ञांनी दिली Good news

मोठा दिलासा! Omicron वर औषध सापडलं; GSK-Vir च्या शास्त्रज्ञांनी दिली Good news

कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूच्या प्रत्येक उत्परिवर्तनावर (Mutation) सोट्रोविमॅब (Sotrovimab) हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूच्या प्रत्येक उत्परिवर्तनावर (Mutation) सोट्रोविमॅब (Sotrovimab) हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूच्या प्रत्येक उत्परिवर्तनावर (Mutation) सोट्रोविमॅब (Sotrovimab) हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

    लंडन, 07 डिसेंबर : सध्या सर्वत्र पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या (Coronavirus) नव्या प्रकाराची म्हणजेच ओमिक्रॉनची (Omicron) दहशत निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अधिक काळ कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाशी झगडणाऱ्या जगाने दुसरी लाट ओसरत असल्याने सुटकेचा नि:श्वास टाकायला सुरुवात केली होती, तोच या विषाणूच्या नव्या रूपानं आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा एकदा जगभर भीती, चिंता यांचं सावट पसरायला सुरुवात झाली आहे.याचवेळी ब्रिटनमधून (Britain) आलेल्या एका बातमीने सर्वांना दिलासा दिला आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूवर प्रभावी औषध सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

    ओमिक्रॉनच्या प्रत्येक उत्परिवर्तनावर (Mutation) सोट्रोविमॅब (Sotrovimab) हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचा दावा एका ब्रिटिश शास्त्रज्ञाने (British Scientist) केला आहे. ग्लॅक्सो स्मिथक्लाइन (GlaxoSmithKline-GSK) आणि तिची अमेरिकेतली भागीदार कंपनी व्हीआयआर (VIR) बायोटेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने हे विशेष औषध विकसित करण्यात आलं आहे. सोट्रोविमॅब ही अँटीबॉडी-आधारित थेरपी (Antibody Based Therapy) आहे. या औषधाने ओमिक्रॉनच्या 37 उत्परिवर्तनांविरुद्ध प्रभावीपणे काम केलं असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

    हे वाचा - Omicron | ओमिक्रॉन धोकादायक आहे की नाही? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

    रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार कोरोनाचा मध्यम ते उच्च पातळीवरचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा मृत्यूचा धोका सोट्रोविमॅबच्या माध्यमातून 80 टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. हे अँटीबॉडी आधारित औषध ओमिक्रॉनसह सार्स सीओव्ही-2च्या (SARS-CoV-2) सर्व प्रकारांविरुद्ध प्रभावी असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात याच्या प्री-क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या होत्या.

    या औषधाच्या परिणामांची खात्री करण्याकरिता आणखी परीक्षण करण्यात येत असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेनं नमूद केलेल्या कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांवर हे औषध प्रभावी असल्याचंही कंपनीने नमूद केलं आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत या औषधाने सगळ्या जगाला मोठा दिलासा दिला आहे.

    First published:
    top videos

      Tags: Corona, Coronavirus