New Variant : कोरोनाचं आणखी एक नवं रूप आलं समोर, लसीचा प्रभावही कमी होण्याची शक्यता

New Variant : कोरोनाचं आणखी एक नवं रूप आलं समोर, लसीचा प्रभावही कमी होण्याची शक्यता

विशेष बाब म्हणजे हा प्रकार नव्या म्यूटेशनसोबत (Virus Mutation) आल्यानं यावर लसीचा (Covid-19 Vaccine) प्रभावही कमी होण्याची शक्यता आहे. जाणकारांनी लोकांना अधिक काळजी घेण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

  • Share this:

ऑरिगॉन 07 मार्च : गेल्या एका वर्षापासून अधिक काळ जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा (Coronavirus) अजूनही कहर सुरूच आहे. कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या चिंता वाढणारी आहे. मात्र, लसीकरणामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार अशी आशा नागरिकांना असतानाच आता चिंतेत आणखी भर घालणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या ऑरिगॉनमध्ये ब्रिटनमध्ये आढळलेल्या विषाणूचा एक नवा प्रकार (New Variant of Corona Virus) आढळला आहे. विशेष बाब म्हणजे हा प्रकार नव्या म्यूटेशनसोबत (Virus Mutation) आल्यानं यावर लसीचा (Covid-19 Vaccine) प्रभावही कमी होण्याची शक्यता आहे. जाणकारांनी लोकांना अधिक काळजी घेण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

संशोधकांना आतापर्यंत या नव्या रुपातील विषाणूचा एकच रूग्ण आढळला आहे. मात्र, हा व्हॅरिएंट बऱ्याच ठिकाणी पसरला असल्याचा अंदाज आहे. हा केवळ एकट्याच व्यक्तीमध्ये तयार झालेला नाही. ऑरिगॉन आरोग्य आणि शास्त्र विद्यापीठाचे ब्रायन ओ रॉक म्हणाले, की आम्ही हे जगाच्या दुसऱ्या भागातून आणलं नाही, तर हे अचानक समोर आलं आहे. रॉक आणि त्यांचे साथीदार सेंटर्श फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिवेंशनसह या नव्या व्हॅरिएंटला ट्रेक करण्याच्या कामाला लागले आहेत. तपासानंतर त्यानी हाती आलेली माहिती शास्त्रज्ञांकडे जमा केली आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेला B.1.1.1.7 अमेरिकेत वेगाने पसरत आहे. विषाणूचा हा प्रकार अतिशय जलद पसरणारा आहे. असा अंदाजही लावला जात आहे, की यामुळे पुढील काही दिवसात अमेरिकेतील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्हं आहेत. ऑरिगनमध्ये मिळालेल्या नव्या प्रकरात अशाच गोष्टीसोबत म्यूटेशनही सामील आहे. हे म्यूटेशन दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि न्यूयॉर्क शहरात पसरलेल्या व्हायरसमध्ये आढळलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या क्लिनिक ट्रायलमध्ये असं समोर आलं आहे, की Eek म्यूटेशन प्रतिकारशक्तीला नुकसान पोहोचवतो. इतकंच नाही यावर लसीचा परिणाम कमी होतो. ब्रिटनमध्ये समोर आलेल्या Eek सह B.1.1.7 व्हॅरिएंट शास्त्रज्ञांनी चिंतेचं कारण सांगितलं आहे. जाणकारांच्या मते, हा शोध आश्चर्यकारक नाही कारण Eek म्यूटेशन जगभरातील सगळ्या व्हायरसमध्ये आढळून येतो. मात्र, B.1.1.7 सोबत झालेलं म्यूटेशन चिंता वाढवणारं आहे. मात्र, घाबरुन न जाण्याचं आवाहन तज्ञांनी केलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: March 7, 2021, 12:26 PM IST

ताज्या बातम्या