Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनामध्ये माणुसकीचं दर्शन घडवतोय हा तरुण; दररोज 100 हून अधिक कोरोनाग्रस्तांना मोफत जेवण

कोरोनामध्ये माणुसकीचं दर्शन घडवतोय हा तरुण; दररोज 100 हून अधिक कोरोनाग्रस्तांना मोफत जेवण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे असे नकारात्मक चित्र असताना समाजातील काही घटक मात्र रुग्ण आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

    हरियाणा, 8 मे : देशात सध्या कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळत आहेत. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे एकूणच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. आक्सिजन, व्हेंटिलेटर बेडस आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून या गोष्टी मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांनी खूप त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे असे नकारात्मक चित्र असताना समाजातील काही घटक मात्र रुग्ण आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, गरीब यांना अन्न, औषधं, ऑक्सिजन सिलेंडर आदींचा पुरवठा काही सामाजिक संस्था, समाजसेवक स्वखर्चाने किंवा वर्गणी काढून पुरवत आहेत. त्यातही अन्नावाचून (Food) कोणीही उपाशी राहू नये यासाठी फूड कॅम्प, अन्न वाटप कार्यक्रम राबवले जात आहेत. महाराष्ट्रात शिवभोजन थाळीचा उपक्रमही गरजूंसाठी आधार बनला आहे. हरियाणात (Haryana) देखील कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. झज्जर (Jhajjar) जिल्ह्यातही दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मात्र तेथील रुग्ण, गरजू, गोरगरीब अगदी डॉक्टरांसाठीसुध्दा कृष्णा गौड (Krishna Gaoud) ही व्यक्ती आधार ठरली आहे. कृष्णा रोज अशा सर्वस्तरातील व्यक्तींना मोफत अन्न पुरवठा करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील झज्जर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. या जिल्ह्यात सध्या 1445 अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहे. बुधवारी 451 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी हीच संख्या 315 होती. झज्जर जिल्ह्यात आतापर्यंत 11382 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 9669 रुग्णांनी कोरोनावर मात करुन ते आपल्या घरी परतले आहेत. या स्थितीत कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी समाजसेवकांनी (Social Workers) पुढाकार घेतला आहे. हे समाजसेवक सध्या गरजूंना घरपोच जेवण पोहोचवत आहेत. हे ही वाचा-Exclusive: दवाखाने, विमा कंपन्यांमध्ये सावळा गोंधळ; 1,71,000 दावे अडकले बहादूरगडमध्ये समाजसेवक कृष्णा गौड कोरोनाबाधित रुग्णांसह डॉक्टर्स आणि रुग्णालयातील स्टाफला जेवण पुरवत आहेत. कृष्णा गेल्या 3 वर्षांपासून काशी अन्नपूर्णा या नावाने गरीबांना अन्न वाटप करीत आहेत. शहरातील सिव्हील हॉस्पिटल समोर (Civil Hospital) दुपारी 12 वाजता अन्न वाटपास सुरुवात होते. केवळ अन्नच नाहीतर कृष्णा गरजू कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा देखील करीत आहेत. ते दररोज 100 पेक्षा जास्त होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) असलेल्या रुग्णांना स्वतः जाऊन अन्न देत आहेत. याबाबत कृष्णा गौड यांनी सांगितले की राजकीय व्यक्तींनी पुढाकार घेऊन गरीब, गरजूंना मदत दिली पाहिजे. कोरोनाच्या संकटाला संधी मानून सेवा केली पाहिजे. मात्र सरकारी अधिकारी आणि यंत्रणा केवळ भ्रष्टाचाराच्या संधी निर्माण करीत आहेत. कोरोनाची स्थिती पाहता राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घराबाहेर पडत सर्वसामान्य लोकांची सेवा केली पाहिजे.
    First published:

    Tags: Covid-19 positive, Covid19, Positive story

    पुढील बातम्या