मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Coronavirus: देशात या राज्यातील लोकांमध्ये सर्वाधिक अँटीबॉडीज; काय आहे महाराष्ट्रातील स्थिती?

Coronavirus: देशात या राज्यातील लोकांमध्ये सर्वाधिक अँटीबॉडीज; काय आहे महाराष्ट्रातील स्थिती?

11 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात कमीतकमी दोन तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटीबॉडीज (Coronavirus Antibodies) विकसित झाल्याचं आढळलं आहे. मध्य प्रदेश यात अव्वल आहे

11 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात कमीतकमी दोन तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटीबॉडीज (Coronavirus Antibodies) विकसित झाल्याचं आढळलं आहे. मध्य प्रदेश यात अव्वल आहे

11 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात कमीतकमी दोन तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटीबॉडीज (Coronavirus Antibodies) विकसित झाल्याचं आढळलं आहे. मध्य प्रदेश यात अव्वल आहे

नवी दिल्ली 29 जुलै : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) 14 जून ते 6 जुलै दरम्यान सेरो सर्व्हे (Sero Survey) केला आहे. यातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, 11 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात कमीतकमी दोन तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटीबॉडीज (Coronavirus Antibodies) विकसित झाल्याचं आढळलं आहे. मध्य प्रदेश यात सर्वात अव्वल असून इथला आकडा 79 टक्के इतका आहे. तर, केरळ 44.4 टक्क्यांवर असून या यादीत सर्वात खाली आहे. आसाममध्ये हा आकडा 50.3 टक्के तर महाराष्ट्रात 58 टक्के आहे.

भारतातील 70 जिल्ह्यांमध्ये आयसीएमआरद्वारे केल्या गेलेल्या राष्ट्रीय सेरो सर्व्हेच्या चौथ्या टप्प्यातील निष्कर्ष केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी प्रसिद्ध केले. सर्वेक्षण केलेल्या जनसंख्येनुसार, सेरोप्रिव्हलेन्स राजस्थानमध्ये 76.2 टक्के, बिहार 75.9, गुजरात 75.3, छत्तीसगढ़ 74.6, उत्तराखंड 73.1, उत्तर प्रदेश 71, आंध्र प्रदेश 70.2, कर्नाटक 69.8 टक्के, तमिळनाडू 69.2 टक्के आणि ओडिशामध्ये 68.1 टक्के आढळलं आहे.

14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता

निष्कर्षाचा उल्लेख करत आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सल्ला दिला आहे, की स्थानिक पातळीवर सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना आखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘सेरोप्रिव्हलेन्स’चा जिल्हास्तरीय डेटा तयार करण्यासाठी आयसीएमआरशी सल्लामसलत करून सिरो सर्वेक्षण करा.

लसीकरणासाठी वृद्धांची होरपळ; पहाटेपासून रांगा लावूनही लस मिळेना, पाहा VIDEO

देशात बुधवारी कोरोनाचे (Corona Cases in India) नवे 43,654 रुग्ण समोर आले आहेत. यानंतर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,14,84,605 वर पोहोचली आहे. तर, 640 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांचा आकडा 4,22,022 वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये (Corona Updates) उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 1,336 नं वाढ झाल्यानंतर एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,99,436 झाली आहे. कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांचा दर 97.39 टक्के इतका आहे.

First published:
top videos

    Tags: Corona spread, Corona virus in india