मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Vaccine च्या तुटवड्यादरम्यान 18+ लसीकरणाला सुरुवात, राज्यात 'या' ठिकाणी आजपासून मिळणार लस

Vaccine च्या तुटवड्यादरम्यान 18+ लसीकरणाला सुरुवात, राज्यात 'या' ठिकाणी आजपासून मिळणार लस

आज काही राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला (Third Phase of Vaccination) सुरुवात होत आहे. तर, काही राज्यांनी लसींच्या तुटवड्याचं कारण देत आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

आज काही राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला (Third Phase of Vaccination) सुरुवात होत आहे. तर, काही राज्यांनी लसींच्या तुटवड्याचं कारण देत आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

आज काही राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला (Third Phase of Vaccination) सुरुवात होत आहे. तर, काही राज्यांनी लसींच्या तुटवड्याचं कारण देत आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

नवी दिल्ली 01 मे : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Covid 19) प्रसार झपाट्यानं होत आहे. दररोज 3 लाखाहून अधिक रुग्ण (Corona Updates) आढळत आहेत. अशात कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी केंद्रानं आजपासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज काही राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला (Third Phase of Vaccination) सुरुवात होत आहे. तर, काही राज्यांनी लसींच्या तुटवड्याचं कारण देत आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडिसा, तमिळनाडू, झारखंड, उत्तराखंड, जम्मू काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी लसीची कमी असल्याचं कारण देत आजपासून लसीकरण सुरू केलेलं नाही. याशिवाय महाराष्ट्र, पंजाब आणि बिहारनंदेखील गुरुवारीच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. शुक्रवारीदेखील त्यांनी पुन्हा ही बाब स्पष्ट केली. मात्र, महाराष्ट्रात काही ठिकाणी लस मिळणार आहे. याआधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 45 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात आली आहे.

इतक्या लोकांनी केली नोंदणी -

एक मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर (Online Registration for Vaccination) 28 एप्रिलला सायंकाळी चार वाजतापासून नोंदणी सुरू झाली. यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत 2.45 लोकांना नोंदणी केली होती. मात्र, बहुतेक राज्यांमध्ये लसीकरणासाठी वेळ दिली जात नसल्याचं वृत्त आहे. देशात आतापर्यंत 45 वर्षावरील व्यक्तींना लसीचे 15.48 डोस दिले गेले आहेत.

महाराष्ट्रात आजपासून काही ठिकाणी लसीकरणाला सुरुवात -

राज्या सरकारनं लसीच्या तुटवड्याचा हवाला देत आजपासून सुरू होणाऱ्या 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेला असमर्थता दर्शवली आहे. मात्र. तरीही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लसीकरणाला (Covid 19 Vaccination in Mumbai) सुरुवात झाली आहे, ही बाब दिलासादायक आहे. बीएमसीनं सांगितलं, की 1 मेपासून मुंबईमध्ये अठरा वर्षावरील व्यक्तींना लस मिळेल. बीएमसीनं दिलेल्या माहितीनुसार, नायर हॉस्पिटल, बीकेसी जम्बो फॅसिलिटी, कूपर हॉस्पिटल, सेवन हिल्स हॉस्पिटल आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये आजपासून अठरा वर्षांवरील व्यक्तींना लस मिळेल. या केद्रांवर 20 हजार लोकांना लस दिली जाईल.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine in market