न्यूयॉर्क, 28 जानेवारी : कोरोना पॉझिटिव्ह आई तिच्या बाळाला स्तनपानाद्वारे संक्रमित करू शकते की नाही यावर लोकांमध्ये खूप गोंधळ आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी नुकतेच अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, स्तनपानाद्वारे संक्रमित महिलेकडून तिच्या बाळामध्ये विषाणूचे संक्रमण झाल्याचे अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. पेडियाट्रिक रिसर्च या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
आईच्या दुधात नगण्य कोरोना विषाणू
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आईच्या दुधात कोरोना विषाणूचे अनुवांशिक घटक फारच कमी प्रमाणात आढळले आहेत. वास्तविक, या मटेरियलमुळे विषाणू मल्टीप्लाय होऊन स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमित करू शकतो. मात्र, या संदर्भात कोणतेही वैद्यकीय पुरावे आढळले नाहीत.
संक्रमित आईच्या दुधापासून मुलांना कोणताही धोका नाही
कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी या संशोधनात 110 महिला स्वयंसेवकांच्या आईच्या दुधाची तपासणी केली. या मातांनी त्यांचे नमुने विद्यापीठाच्या संशोधनासाठी दान केले. यातील 65 महिलांना रक्तदानाच्या वेळी कोरोनाची लागण झाली होती. त्याचवेळी 9 महिलांमध्ये विषाणूची लक्षणे होती. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. याशिवाय 36 महिला अशा होत्या ज्यांची लक्षणे असूनही त्यांची चाचणी झाली नाही.

शास्त्रज्ञांना 110 पैकी 7 नमुन्यांमध्ये म्हणजे 6% स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये कोरोना विषाणू (SARS-CoV-2) च्या मूळ स्वरूपाची जेनेटिक मटेरियल आढळली. या महिलांना एकतर कोरोनाची लागण झाली होती किंवा व्हायरसची लक्षणे होती.
संशोधनाच्या दुसऱ्या टप्प्यात संशोधकांनी या 7 महिलांकडून पुन्हा आईच्या दुधाचे नमुने घेतले. 1 ते 97 दिवसांच्या दरम्यान घेतलेल्या या नमुन्यांमध्ये कोरोनाचे अनुवांशिक घटक आढळले नाहीत. याचा सरळ अर्थ असा होतो की आईच्या दुधात विषाणूची वाढ होत नाही.
आता नाकावाटेही मिळणार कोरोना लस; Intranasal Dose ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल
संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ पॉल क्रोगस्टॅड म्हणतात, "आईचे दूध हे लहान मुलांसाठी पोषणाचा एक उत्तम स्रोत आहे. संशोधनात आम्हाला असे कोणतेही पुरावे आढळले नाहीत की कोविड-19 ची लागण झालेल्या मातांच्या आईच्या दुधात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे." तसेच बाळांना संसर्ग झाल्याचा कोणताही पुरावा नाही, जे सूचित करते की त्यांना स्तनपानाचा धोका नाही."
जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल तर स्तनपान कसे करावे?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) म्हणते की अशा महिला मुलांना स्तनपान करू शकतात. मात्र, काही खबरदारी घेऊन. उदाहरणार्थ, मुलाला कुशीत घेण्यापूर्वी तुमच्या आजूबाजूच्या वस्तू निर्जंतुक करा, साबण-पाणी किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करा आणि मास्क घाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.