मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /जग कोरोनाने हादरलं! आता अन्य विषाणूजन्य आजारांवरही पुन्हा संशोधन सुरू

जग कोरोनाने हादरलं! आता अन्य विषाणूजन्य आजारांवरही पुन्हा संशोधन सुरू

 कोरोनावर संशोधन सुरु असतानाच संशोधकांनी अनेक सामान्य विषाणूजन्य संसर्गावर (Virus) देखील पुन्हा संशोधन सुरु केलं आहे.

कोरोनावर संशोधन सुरु असतानाच संशोधकांनी अनेक सामान्य विषाणूजन्य संसर्गावर (Virus) देखील पुन्हा संशोधन सुरु केलं आहे.

कोरोनावर संशोधन सुरु असतानाच संशोधकांनी अनेक सामान्य विषाणूजन्य संसर्गावर (Virus) देखील पुन्हा संशोधन सुरु केलं आहे.

    नवी दिल्ली, 25 एप्रिल : सध्या जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूवर (Corona Virus) सर्वांगीण संशोधन सुरु आहे. लवकरात लवकर या संसर्गजन्य आजारावर ठोस इलाज उपलब्ध व्हावेत आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी संशोधक अहोरात्र कष्ट घेत आहेत. परंतु, कोरोनावर संशोधन सुरु असतानाच संशोधकांनी अनेक सामान्य विषाणूजन्य संसर्गावर (Virus) देखील पुन्हा संशोधन सुरु केलं आहे. हे संशोधन यापूर्वी निधी, संशोधकवृत्तीचा अभाव आदी कारणांमुळे दुर्लक्षित होतं ते आता नव्याने सुरू झालं आहे, असं एका अहवालात म्हटलं आहे.

    वास (Smell) येण्याची क्षमता जाणं, हृदय, फुफ्फुसांत जळजळणं (Inflammation), मज्जातंतूचे नुकसान होणं आणि फुफ्फुसाच्या (Lungs) अस्तरांमध्ये लहान रक्ताच्या गुठळ्या होणं ही लक्षणं केवळ कोरोनामध्येच दिसत नाहीत. अल्प प्रमाणात का होईना परंतु, श्वासाशी संबंधित (Respiratory) आणि विषाणूजन्य इतर आजारांमध्येही रुग्ण या लक्षणांनी त्रस्त होतात, असं न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

    अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील मोनोल केमिकल सेन्सेस सेंटर या ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेचे सहयोगी संचालक डॅनियल रिड याबाबत म्हणाले, की महामारी (Pandemic) येण्यापूर्वी वास येण्याच्या क्षमतेवर झालेल्या परिणामाच्या संशोधनाकरिता अनुदान मिळणं कठीण होतं. याबाबत कोणालाही पर्वा नव्हती. परंतु आता याकरिता वित्त पुरवठा करणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

    हे ही वाचा-कोरोनामुळे स्मशानातील निखारे धगधगतेच; दापोलीतील घटना वाचून अंगावर काटा उभा राहील

    नेदरलॅंडमधील इरास्मस विद्यापीठातील संशोधक मार्को गोइजेनबीयर म्हणाले की यासारख्या बाबींवर संशोधनासाठी निधी मिळवणं कठीण होतं. मोठ्या जर्नल्स आणि देणगीदारांना याकरिता निधी देण्यात रुची नव्हती.

    मायोकार्डिटीसमुळे (Myocarditis) जगभरातील 1.5 दशलक्ष लोक त्रस्त होते. त्यामुळे याबाबत संशोधन करण्यात आलं. परंतु थकवा आणि कोरोनाची लक्षण याचा संबंध अधोरेखित होत नव्हता. द न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक ब्रुस मॅकमॅनस म्हणाले की कधीकधी कोरोनामुळे येणाऱ्या थकव्याने हृदयविकार उदभवू शकतात. तसेच फुफ्फुसं खराब होणे, हे कोरोनाचे अजून एक गंभीर लक्षण आहे.

    येल स्कूल ऑफ मेडिसीन मधील फुफ्फुसांचे संशोधक क्लेमेन्ट ब्रिटो-लिओन म्हणाले की इन्फ्लुएन्झा, हर्पस विषाणू आणि साइटोमेगालो विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्णाच्या फुफ्फुसाला दुखापत होऊ शकते किंवा डाग पडू शकतात. फुफ्फुसाच्या अस्तरांमधील रक्ताच्या गुठळ्यांचा (Blood Clots) संबंध हा कोरोना आणि इन्फ्लुएन्झाशी जोडला गेल्याचे अहवालातून स्पष्ट होते.

    हे ही वाचा-आज राज्यात 74,045 रुग्णांची कोरोनावर मात तर 66836 नवीन रुग्णांची नोंद

    जेव्हा फ्लूचे विषाणू श्वसनमार्गातील खालच्या भागात संक्रमित होतात, तेव्हा ही असामान्य स्थिती निर्माण होते. कारण बहुतेक लोकांमध्ये संरक्षणात्मक रोगप्रतिकारशक्ती (Immunity) काही प्रमाणातच असते, असे नेदरलॅण्डमधील इरास्मस विद्यापीठातील संशोधक मार्को गोइजेनबीयर यांनी सांगितले.

    First published:

    Tags: Corona spread, United States of America