मुंबई, 15 सप्टेंबर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. आज राज्यात 515 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जास्त आहे. आतापर्यंत राज्यात 30409 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आजच्या दिवसात राज्यात 20482 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले असून 19423 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 775273 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 70.62 % एवढे झाले आहे. राज्यात आज ५१५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर 2.77 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5409060 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 1097856 (20.29 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1734164 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 37225 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 291797 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
20,482 new #COVID19 cases and 515 deaths reported in Maharashtra today; 19,423 patients discharged. Total cases in the state rise to 10,97,856 including 30,409 deaths and 7,75,273 patients discharged. Active cases at 2,91,797: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/l4XnVTDOwZ
— ANI (@ANI) September 15, 2020
आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झालेल्या जिल्ह्यांची आकडेवारी मुंबई -8230 पुणे -4888 ठाणे -4361 नागपूर -1446 कोल्हापूर -1017 नाशिक -1071 हे वाचा- Corona Vaccine कधी येणार? आता बिल गेट्स यांनी सांगितली वेळ देशाबाबत सांगायचे झाल्यास देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 50 लाखांच्या घरात जाण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी काल तब्बल सहा दिवसांनी नवीन रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली. 24 तासांत 83 हजार 809 नवीन रुग्ण सापडले. यासह एकूण रुग्णांच्या संख्या आता 49 लाख 26 हजार 734 झाली आहे. तर, एकाच दिवसात 1 हजार 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांचा आकडा 80 हजारपार गेला आहे.

)







