जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / 'इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार'; या देशात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर, एका दिवसात मृत्यूचा रेकॉर्ड

'इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार'; या देशात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर, एका दिवसात मृत्यूचा रेकॉर्ड

'इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार'; या देशात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर, एका दिवसात मृत्यूचा रेकॉर्ड

Coronavirus Getting Worse : या देशात गेल्या 24 तासांत 85,948 नवीन रुग्णसमोर आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

Brazil Coronavirus Update: जगभरात कोरोना व्हायरसने भीषण रुप घेतलं आहे. (Brazil Coronavirus Getting Worse) अनेक देशांमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यापैकी ब्राझीलमध्ये तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसत आहे. या देशात शनिवारी रेकॉर्ड 3,438 रुग्णांचा मृत्यू झाला. या देशाच्या आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली. सतत दुसऱ्या दिवशी देशात 3000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Brazil Coronavirus Deaths). येथे गेल्या फ्रेबुवारी महिन्यात शेवटी कोरोना व्हायरसची केस समोर आली होती, ज्यानंतर तिसऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शुक्रवारी 3,650 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जी महासाथीची सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे एकूण 3,10,550 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 85,948 नवीन रुग्णसमोर आले आहेत. (How Many Died of Coronavirus in Brazil). ज्यानुसार संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 12,490,362 पर्यंत पोहोचली आहे. ब्राजील सद्यस्थितीत अमेरिकेनंतर जगातील दुसरा सर्वात प्रभावित देश आहे. हा देश संसर्गाच्या नवीन केसेस आणि लोकांच्या मृत्यू प्रकरणात जगातील दुसरा सर्वात प्रभावित देश आहे. हे ही वाचा- लॉकडाऊननंतरही ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख; रुग्णसंख्येमुळे प्रशासन चिंतेत किती जणांंचं केलं लसीकरण स्थानिक मीडियानुसार ब्राजीलमध्ये शुक्रवारपर्यंत 19.5 मिलियन लोकांना कोविड-19 ची लस देण्यात आली आहे. ज्यात 14.88 मिलियन लोकांना लशीचा पहिला डोज देण्यात आला आहे. तर 4.68 मिलियन लोकांना लशीच्या दोन्ही मात्र देण्यात आल्या आहेत. देशातील बिघडणारी परिस्थिती पाहून रुग्णालयांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. ब्राजीलमधील एक प्रगत शहराच्या मेयरने सांगितलं आपल्या जीवनाला रांगेत लावा, तेव्हा आम्ही अर्थव्यवस्था वाचनू शकू, याचा अर्थ अर्थव्यवस्था लोकांच्या जीवापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे. (Brazil Coronavirus Death Toll). इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार रुग्णालयांचे म्हणणं आहे की, त्यांनी कधीच अशा प्रकारे आरोग्य यंत्रणेचा पराभव होताना पाहिलं नाही. वाढत्या रुग्णसंख्येमागे सरकारचा निष्काळजीपणाही जबाबदार आहे. (How Many Covid Cases in Brazil Today). येथील माजी राष्ट्रपती लुइज इनासियो लूला दा सिल्वा यांनी शुक्रवारी सांहितलं की, कोरोनामुळे होणारे मृत्यू हे इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार आहे. त्यांनी विद्यमान राष्ट्रपती जेयर बोल्सनारो (Jair Bolsonaro) यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, मंगळवारी ब्राजीलमध्ये 3,158 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आमच्या इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार आहे. आम्हाला ब्राझीलचा कोविड-19 पासून बचाव करायचा आहे. जर ही व्यक्ती (बोल्सनारो)  असंच शासन करीत राहिली तर देश महासाथीचा सामना करू शकणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात