मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनाची लस तर तयार होईल, मात्र पुढील व्यवस्था सर्वात कठीण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

कोरोनाची लस तर तयार होईल, मात्र पुढील व्यवस्था सर्वात कठीण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

यात सर्वात जास्त आशा ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीपासून असून त्याच्या मानवी चाचण्यांनाही सुरूवात झाली आहे.

यात सर्वात जास्त आशा ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीपासून असून त्याच्या मानवी चाचण्यांनाही सुरूवात झाली आहे.

सर्वजण कोरोना लशीच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र खरं संकट तर त्याच्यानंतर उद्भवणार आहे

हैदराबाद, 22 नोव्हेंबर: CSIR अंतर्गत काम करणारे सेंटर फॉर सेल्युलर अँण्ड मॉलिक्युलर बायोलॉजीचे डायरेक्टर यांनी सांगितलं की, कोविड-19 शी लढण्यासाठी जी लस तयार केली जात आहे, ती देशभरात पोहोचविणे, सप्लाई चेनसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. ते पुढे म्हणाले की लस येईपर्यंत कोरोना विषाणूचा प्रसार  रोखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवायला हवेत.

सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा म्हणाले की, लस खरेदी व वितरणातून सरकार आपले काम करेल, परंतु संसर्ग नियंत्रित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याव्यतिरिक्त, लस उपलब्ध होईपर्यंत संसर्ग रोखण्यासाठी अधिक प्रभावी एंटी-इन्फेक्टीव्ह औषधांसाठी संशोधन केले पाहिजे. ते म्हणाले की कोविड -19 च्या लसीचे उत्पादन वगळता रसद व पुरवठा या इतर अडचणी आहेत.

हे ही वाचा-...तर 20 लाख मुलांचा होऊ शकतो मृत्यू; कोरोनाच्या संकटात Unicef चा इशारा

कमीतकमी दोन डोस आवश्यक असतील, हे अत्यंत कठीण काम

भारतात गर्भवती महिलांसाठी टिटॅनस लसीखेरीज प्रौढांसाठी लसीकरण कार्यक्रम नाही. मिश्रा म्हणाले की, मुलांना लसीकरण करण्यात अनेक अडचणी आहेत. कारण बरेच लोक लस घेत नाहीत. बहुतेक लशींसाठी किमान दोन डोस आवश्यक असू शकतात आणि दुसरी लस ठराविक दिवसांनी ठरवावी लागेल असेही त्यांनी नमूद केले. या बाबी सुनिश्चित करणं आणखी एक आव्हान असेल.

'मोठ्या शहरांशिवाय लस स्टोअर करणं शक्य नाही'

मिश्रा म्हणाले की, काही कंपन्यांच्या लस उणे 70 अंश सेल्सिअस तापमानावर ठेवाव्या लागतील. मोठ्या शहरांव्यतिरिक्त इतर ठिकाणी व्यवस्थापन करणे कठीण होईल. ते म्हणाले की याशिवाय आणखी एक चिंतेची बाब आहे की दोन ते तीन वर्षांनंतरच लस दीर्घकाळापर्यंत खरोखर प्रभावी आहे की नाही हे कळेल.

सीसीएमबी कोविड - 19 लशीसाठी 'प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट' विकसित करीत आहे. अरविंदो फार्माबरोबरच्या कराराचा हा एक भाग आहे. 'प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट' मध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात रूपांतरित केली जाऊ शकते की नाही आणि त्याच्या संकल्पनेची व्यावहारिकता निश्चित केली जाऊ शकते का, हे तपासता येईल. मिश्रा म्हणाले की, सीएसआयआरचे उद्दिष्ट सुमारे तीन महिन्यांत आपल्या प्रयत्नांना निष्कर्षापर्यंत पोहोचविणे हे आहे. ते तयार झाल्यावर पुढील प्रक्रियेसाठी ते अरबिंदो फार्माकडे देण्यात येईल, असे मिश्रा म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Coronavirus