• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • बापासाठी लेकाने घेतलं 35 लाखांचं लोन, मात्र कोरोनामुळे मृत्यू; आता EMI मध्ये जातोय पगार

बापासाठी लेकाने घेतलं 35 लाखांचं लोन, मात्र कोरोनामुळे मृत्यू; आता EMI मध्ये जातोय पगार

फोटो-प्रतिकात्मक

फोटो-प्रतिकात्मक

राजन यांचे वडील 10 दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे रुग्णालयाने व्हेंटिलेटरसाठी दररोज 50 हजार रुपयांचा चार्ज लावला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 6 जून : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या देशात कोरोनाची रुग्णसंख्या 2,88,09,339 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,14,460 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देश कोरोनाचा सामना करीत असताना अद्यापही अनेक रुग्णालये नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा रुपये आकारत आहेत. कोरोना रुग्णालयातून भलं मोठं बिल पाहून नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाने आपल्या वडिलांच्या उपचारासाठी तब्बल 35 लाखांचं लोक घेतल्याची घटना समोर आली आहे. वाईट म्हणजे मुलगा आपल्या वडिलांना वाचवू शकला नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता या मुलाचा संपूर्ण प्रकार EMI मध्ये जात आहे. गुजरातच्या गांधी नगर येथे राहणारे राजन यांनी आपले वडील राजन भलाणी यांच्यावर चांगले उपचार करता यावेत, यासाठी 35 लाखांचं लोन घेतलं. मात्र जयेश भलाणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 40 दिवस गांधीनगर येथील वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हे ही वाचा-1 टक्के कोरोना बाधितांमुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण;अन्यथा हटले असते निर्बंध वडिलांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने दिलेलं बिल पाहून राजन यांना धक्का बसला. राजन यांचे वडील 10 दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे व्हेंटिलेटरसाठी दररोज 50 हजार रुपयांचा चार्ज लावला. औषधं आणि इंजेक्शनसाठी दररोज 75 हजार रुपयांचा वसुली करण्यात आली. असं पाहता रुग्णालयाचं एकूण बिल 18 लाखांपर्यंत पोहोचलं. इंजेक्शन आणि औषधांसाठी 15 लाख रुपये खर्च आला. यासाठी राजन यांनी बँकेकडून 35 लाखांचं लोन काढलं आहे. आलेला सर्व पगार लोनमध्ये जात असल्याचं राजन यांनी म्हटलं आहे. सध्या भारत देश कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारसह स्थानिक पातळीवर वेगानं प्रयत्न सुरु आहेत. मात्र दुसरीकडे आज देशातल्या कोरोना (New Corona Case) संदर्भात एक दिलादायक बातमी समोर आली आहे. देशात गेल्या दोन महिन्यानंतर सर्वांत कमी रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 93. 67 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त आहे. (Coronavirus in India Latest Updates Today 6 June 2021)
  Published by:Meenal Gangurde
  First published: