मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनावर औषध शोधल्याचा दावा अंगलट, सुप्रीम कोर्टाचा डॉक्टरला दणका

कोरोनावर औषध शोधल्याचा दावा अंगलट, सुप्रीम कोर्टाचा डॉक्टरला दणका

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान ही याचिका फेटाळात डॉक्टरची चांगलीच खरडपट्टी काढली समही दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान ही याचिका फेटाळात डॉक्टरची चांगलीच खरडपट्टी काढली समही दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान ही याचिका फेटाळात डॉक्टरची चांगलीच खरडपट्टी काढली समही दिली आहे.

    नवी दिल्ली 21 ऑगस्ट: कोरोनाचं जगभर थैमान सुरु आहे. त्यावर रामबाण औषध नसल्याने कोरोनाचा प्रसार वेगात होत आहे. अनेक कंपन्यांनी त्यावर लस शोधल्याचा शास्त्रीय दावा केला असून त्याच्या चाचण्याही सुरु आहेत. मात्र भारतात अनेक जण यावर आयुर्वेदीक औषध शोधल्याचा दावा करत आहेत. असाच दावा करत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या एका डॉक्टरला सुप्रीम कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. कोर्टाने त्या डॉक्टरला 10 हजारांचा दंड ठोठावत समजही दिली आहे. हरियाणातले डॉक्टर ओमप्रकाश ज्ञानतारा हे BAMS डॉक्टर असून त्यांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. त्या फक्त दावा करूनच थांबल्या नाहीत तर त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत केंद्र सरकारला हे औषध वापरण्यासाठी आदेश द्यावेत अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली. स असून त्यांना 10 हजारांचा दंडही केला आहे. असे दावे करणाऱ्यांना समज मिळावी म्हणून हा दंड केल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. हे वाचा -  अध्यक्ष ट्रम्प यांच्या तोडीचं PM मोदींसाठी विमान, वैशिष्ट्ये जाणून व्हाल थक्क! कोरोनावर औषध शोधल्याचे दावे देशातल्या अनेक भागात आयुर्वेदाच्या नावावर करण्यात येत आहेत. त्यातली बहुतांश औषधी ही फक्त प्रतिकारशक्ती वाढविणारी आहेत. त्याचबरोबर त्यांचा शास्त्रीय अभ्यासही झालेला नाही. त्यामुळे अनेक लोक या दाव्यांना बळी पडत असल्याच्या घटनाही घडत असून त्यासाठी ही डॉक्टर मंडळी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. दरम्यान, 20 दिवसांत जवळपास देशात 62 ते 69 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत होती मात्र एका दिवसांत आज दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 24 तासांत 62 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के आहे. आता बस्स झालं, DJ सुरु करण्याची परवानगी द्या; बँडवाल्यांनी वाजतगाजत काढला मोर्चा केंद्रीय आरोग्य मंत्र्यानं दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात 68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासांत 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्थांची संख्या 29 लाखावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 54 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus, Suprim court

    पुढील बातम्या